Published On : Tue, Mar 31st, 2020

आपतकालीन परिस्थित रुग्णाची गैरसोय टाळण्यासाठी अँबुलन्सचे सेवादर निश्चित

Advertisement

जिल्हाधिकारी याचे आदेश

नागपूर : कोरोना विषाणूं मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मध्ये इतर व्याधीने ग्रस्त आलेल्या रुग्णची वाहतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकेची मागणी होत आहे, या परिस्थितीत सेवा पुरवठादार जास्त दर आकारत आल्यामुळे रुग्णवाहिकेचे सेवा दर निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली,

नागपूर शहरात महापालिका हद्दीत 25 किलोमीटर पर्यंत मारुती वाहन 500 रूपये, टाटा सुमो 550 रुपये, विंगर 600 रुपये, टेम्पो ट्रॅव्हल 700 रुपये निश्चित करण्यात आले आहे, वाताणुकीत यंत्रणा असल्यास 10 टक्के अतिरिक्त दर आकारण्यात येतील,

नागपूर शहराबाहेरील हद्दीनंतर पत्येक किलोमीटरचा मारुती 10 रुपये, टाटा सुमो 10 रुपये, विंगर 12 रुपये, टेम्पो ट्रॅव्हल र 14 रुपये दर आकारण्यास अनुमती देण्यात आली आहे, वातानुकूलित वाहनांसाठी 10 टक्के दर अतिरिक्त आहेत,

महाराष्ट्र वाहन अधिनियमा अंतर्गत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या मान्यतेने रुग्णवाहिकेचे भाडे दर निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री ठाकरे यांनी दिली.

रुग्णवाहिकेचे ठरविण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येणाऱ्या सेवा पुरविणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियमा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली,