नागपूर : शहरातील अंबाझरी रोडवरील इंदिरा गांधी रुग्णालय चौकात सोमवारी एसटी बस आणि दूधवाहू वाहनामध्ये भीषण अपघात झाला. भरधाव वेगात झालेल्या जोरदार धडकेमुळे एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बसचा पुढील भाग चेंदामेंदा झाला, तर दूधवाहू वाहनाचेही मोठे नुकसान झाले.
अपघात होताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि अनेक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे अंबाझरी रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताची नोंद केली असून नेमके कारण आणि जखमींची अधिकृत संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 60,000 /-
Gold 22 KT
₹ 1,48,500 /-
Silver/Kg₹ 2,41,500/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above