Published On : Thu, Oct 6th, 2022

अंबाझरी स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री कारवाई करणार का – आप

Advertisement

बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुन्हा बांधून देणार का याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवशी दीक्षाभूमी कार्यक्रमात द्यावे – आप

अंबाझरी उद्यान स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे नागपूर शहर वासियांकरिता सामाजिक चळवळीचे केंद्र होते. शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक दृष्टीने महत्त्वाची वास्तू होती. ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यांना उजळा मिळत राहावा म्हणून अंबाझरी उद्यानात सन 1975 ला मनपा द्वारे निर्मित करण्यात आले होते. तसेच हि वास्तु शासनाच्या निधीने उभारण्यात आली. या भवनात सन 1975 ला भव्य जागतिक बुद्ध परिषद देखील आयोजित करण्यात आली होती.

माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये राज्य शासनाच्या निर्णयाद्वारे ही जागा महानगरपालिकेकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यात आली. वर्ष 2021 मध्ये संपुर्ण जग कोरोणा महामारीच्या संकटाला सामोरे जात असताना अंबाजरी उद्यान परिसरामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारे अवैधरित्या उध्वस्त करण्यात आले. डॉ बाबासाहेब सांस्कृतिक भवन कोणी पाडले, का पाडले याची जबाबदारी कुणाची आहे, याला जबाबदार कोण हा प्रश्न नागपूरच्या जनतेसमोर आज उभा आहे.

आम आदमी पार्टी विद्यमान उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न करीत आहे की त्यांच्या मतदार संघात स्थित व त्यांच्याच डोळ्यासमोर हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्यांवर काय कारवाई करणार ? व याचे उत्तर त्यांनी उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दीक्षाभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमात नागपूरच्या जनतेला द्यावे अशी मागणी देखील आम आदमी पार्टी करीत आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे अंबाझरी उद्यानात पुन्हा उभारण्यात येईल किंवा नाही असा प्रश्न देखील डॉ देवेंद्र वानखडे आम आदमी पार्टी, यांनी उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.

आम आदमी पार्टी या विषयावर नागपूर शहरात येणाऱ्या काळात तीव्र जन आंदोलन करणार – आप.

आम आदमी पार्टी, नागपूर
भूषण ढाकुलकर,
सचिव नागपूर शहर
विदर्भ मीडिया प्रमुख
आम आदमी पार्टी राज्य मीडिया संघ
संपर्क : *8928949604*
*8600991751*