Published On : Mon, Mar 30th, 2020

गरजू कुटुंबांना रेशन वाटप

Advertisement

बुटीबोरी एम आय डी सी पोलिसांचा उपक्रम
पोलिसांच्या अविरत उपक्रमाला पोलीस अधिक्षकांची भेट

नागपूर:- बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत भारकस,पोही, टाकळघाट,गंगापूर,सुकळी, गणेशपूर,सालईदाभा,टेम्भरी व वाटेघाट येथील गरजवंत व गरीब कुटुंबांना रेशन वाटपाचे अविरत काम बुटीबोरी एम आय डी सी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद ठाकरे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी काही सामाजिक संस्था व दानदात्याच्या सहकार्याने गत चार पाच दिवसांपासून करीत असून आपल्या माणुसकीचा परिचय देत आहे.त्यांच्या याच उत्तम कार्याची दखल घेत नागपूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज दि ३० मार्च ला सुकळी येथे सुरू असलेल्या रेशन वितरण स्थळी अकस्मात भेट देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढता कुणीही नागरिक उपाशी पोटी राहू नये म्हणून पोलिसांनी घ्यावयाची खबरदारी याबाबद सूचना केल्या.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉक डाऊन करून जमाव व संचारबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे बुटीबोरी एम आय डी सी मध्ये कचरा,भंगार,राजकाम तसेच पोटाची खडगी भरण्यासाठी मिळेल ते काम करून नगदी पैसे घेऊन सकाळ संध्याकाळ ची चूल पेटविणारे अनेक कुटुंब आहेत.ज्यांना ना कालची चिंता ना उद्याची पर्वा जे फक्त आज व आताचाच विचार करित जगतात अशा शेकडो कुटुंबांना बुटी बोरी एम आय डी सी पोलिसांनी ५ किलो कणिक,दोन किलो तांदूळ,१ किलो सोयाबीन तेल,हळद, अशी मदत करून आपल्या माणुसकीचा परिचय दिला.

बुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी औधोगिक वसाहत आहे.त्यामुळे येथे देशाच्या विविध प्रांतातून अनेक जाती,धर्माचे लोक उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहे.त्यांना औधोगिक क्षेत्रा जवळील ज्या गावात काम मिळेल तिथे ते राहू लागले.तथापि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व यंत्रणाच कोलमडून पडल्यामुळे संपूर्ण देशात जमावबंदी व संचारबंदी लागू झाल्यामुळे यांच्या हाथाला कामच उरले नाही.

काम नसल्यामुळे पैसा नाही व पैसे नसल्यामुळे चूल कशी पेटवायची असा प्रश्न निर्माण झाला.अशातच बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे ना पो शी इकबाल शेख हे आपले सहकारी पोलीस कर्मचारी प्रफुल राठोड,अमोल कोठेवार, प्रमोद बनसोड,विजय निकोसे यांनी केलेल्या मदतीने हे गरीब गरजवंत कुटुंब सुखावले असून मदतकर्ताचे मनोमन आभार मानले.परंतु अशा मदतीवर आम्ही किती दिवस जगणार?असा प्रश्न उपस्थित करून शासनाने आम्हाला राशन,पाणी व जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात अशी आशा व्यक्त केली.