
नागपूर : एशियातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसीएच) मध्ये गरीब रुग्णांना जेनेरिक औषधांऐवजी महागडी ब्रँडेड औषधे लिहून दिली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिंदे सेनेने तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) उपशहरप्रमुख राहुल पांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जीएमसीएचचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. काही डॉक्टर रुग्णांना हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्यांवर विशिष्ट कंपन्यांच्या ब्रँडेड औषधांची नावे लिहून देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारी नियमांनुसार डॉक्टरांनी औषधांचे जेनेरिक नाव लिहिणे अपेक्षित असताना काही ठिकाणी ब्रँडेड औषधांना प्राधान्य दिले जात असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे अवघ्या १० रुपयांची ओपीडी पावती काढून उपचारासाठी येणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना औषधांसाठी हजारो रुपये खर्च करावे लागत असल्याचे राहुल पांडे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून जेनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असताना जीएमसीएचमध्ये मात्र महागड्या औषधांचा आग्रह धरला जात असेल, तर ही गरीब रुग्णांच्या खिशावरची सरळ लूट असल्याचा आरोप शिंदे सेनेने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच रुग्णांना परवडणारी आणि जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे जीएमसीएचमधील औषध खरेदी आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन पद्धतीबाबत नवा वाद निर्माण झाला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोरभवन बस स्टॉप पर चाकू लेकर हंगामा कर रहा आरोपी गिरफ्तार #nagpurnews...
नागपुर में वाहन चोर गिरोह का भंडाफोड़ #nagpurnews #crime #latestnews #accusedarrested #maharashtra
अहिल्यादेवी स्मारक में देरी पर आक्रोश #maharashtranews #latestnews #newsupdate #ahilyadeviholkar
नई संच मान्यता नीति के खिलाफ आंदोलन.. #maharashtranews #shishak #andolan #latestnews #news
वायरल वीडियो से प्रशासन घिरा विवादों में.. #maharashtranews #latestnews #viralvideo #news
सिंधुदुर्ग में बारिश से किसानों को राहत #maharashtranews #barish #mansoon #kisan #latestnews








