
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने आपल्या मेहुण्यावर कामाच्या बहाण्याने घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. घटनेनंतर धमकीचे संदेश पाठवत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची बहीण मुलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी गेली होती. त्याचवेळी आरोपीने पीडितेला काम असल्याचे सांगून घरी बोलावले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने तिला कमाल चौक परिसरात सोडून दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, घटनेनंतर आरोपीने मोबाईलवर वारंवार धमकीचे संदेश पाठवले. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास हात कापण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव आणला.
२३ जून रोजी आरोपीच्या पत्नीने पीडितेला तिच्या पतीशी सुरू असलेल्या संपर्काबाबत विचारणा केली. त्यावेळी पीडितेने संपूर्ण घटना बहिणीसमोर सांगितली. त्यानंतर आरोपीशी संपर्क ठेवण्यास नकार दिल्यावर आरोपीने पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
यानंतर पीडितेने मानकापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




