Published On : Sun, Apr 29th, 2018

महापालिकेचे सर्व झोन “झिरो पेंडन्सी” करा : मुख्यमंत्री

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयाचे कामकाज हे ‘झिरो पेंडन्सी’ करा. ज्या दिवशी फाईल कार्यालयात येईल, त्या दिवशी त्या फाईलचा निपटारा करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रविवार (ता.२९) महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयाच्या नवनिर्मित इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, राज्यसभेचे खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ.मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार गिरिश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, झोन सभापती यशश्री नंदनवार, माजी झोन सभापती संजय चावरे, कर व कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, नगरसेवक प्रवीण भिसीकर, संजय महाजन, नितीन साठवणे, नगरसेविका अभिरूची राजगिरे, शकुंतला पारवे, डॉ.ज्योती भिसीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी माझ्या मंत्रालयात झिरो पेंडन्सी प्रणाली राबविली आहे. एक कोटीपेक्षा जास्त फाईल्सचा निपटारा करण्यात आलेला आहे. ज्या दिवशी फाईल दाखल होते, त्याच दिवशी त्या फाईलचा निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी महापौर नंदा जिचकार यांना केल्या. त्यासंदर्भातील विभागीय आयुक्त दळवी यांचे महापालिकेत झिरो पेंडन्सी या विषयावर कार्यशाळा घेण्याचे महापौर आणि आयुक्त यांनी सूचित केले. सतरंजीपुरा झोनच्या नवी इमारत उभारणीसाठी त्यांनी महापालिकेचे अभिनंदन केले. मी महापौर असताना नितीनजी बांधकाम मंत्री होते. त्यावेळी महापालिकेचे कामकाज केंद्रीय पद्धतीने केले जात असत. त्यावेळी मी आणि नितिनजींनी कामकाजाची विकेंद्रीपद्धती लागू करत महापालिकेचे कामकाज झोन पद्धतीने सुरू केले होते. तत्कालिन नगरसेवक व विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांनी पुढाकार घेऊन सतरंजीपुरा येथे झोन कार्यालय व्हावे, ही मागणी रेटून धरली होती. आज सतरंजीपुरा झोनची सुसज्ज इमारत उभी आहे. येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे समाधान नक्कीच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत महापौर नंदा जिचकार आणि सभापती यशश्री नंदनवार यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोन सभापती यशश्री नंदनवार यांनी केले. कार्यकारी अभियंता राजेश भूतकर आणि कंत्राटदार संजय मेडपल्लीवार यांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. माजी ज्येष्ठ नगरसेवक विठू महाजन यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. कार्यक्रमाला स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, मनिषा अतकरे, नगरसेवक रमेश पुणेकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement