Published On : Tue, Oct 23rd, 2018

राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर करणार – बबनराव लोणीकर

Advertisement

मुंबई: राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज दिली.

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. लोणीकर व श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी.वेलरासू व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

यावेळी श्री. लोणीकर म्हणाले, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदअंतर्गत सर्व पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत. या योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. ज्या योजनांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रलंबित आहेत त्या तात्काळ देण्यात येतील. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.

यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठ्याअभावी बंद असतील त्या तात्काळ सुरु करण्यात येतील. तसेच राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर करण्याबाबत लवकरच कार्यवाही सुरु करण्यात येईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement