चाकुच्या धाकावर दोघां आरोपीने १लाख १५ हजार लुटुन फरार
कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्ग क्र ४४ वरील कन्हान शहरातील कपुर गोडाऊन येथील सी तिवारी गँस एजन्सी चे सिंलेडर वाटप के़द्रात अञात दोन आरोपी येऊन दोन्ही महिलेला चाकुचा धाक दाखवुन १२७ सिंलेडर चे नगदी १ लाख १४ हजार ९९८ रूपये लुटुन मोटार सायकलने पिपरीच्या दिशेने पसार झाले .
मंगळवार (दि.२३) ला दुपारी दिड ते दोन वाजता दरम्यान नागपुर जबलपुर महामार्ग क्र ४४ लागुनच असलेल्या कन्हान शहरातील कपुर गोडाऊन येथे सी तिवारी गँस एजन्सी चे तात्पुरते सिलेंडर वाटप केंद्र सुरू आहे . कार्यालयातील कंचन तिवारी व कोमल बोरकर भर दुपारी अञात दोन आरोपी तोंडावर पिवळा व पांढरा स्कार्प बांधुन कार्यालयात घुसले व कंचन तिवारी व कोमल बोरकर यांच्या मानेवर चाकु लावुन त्यांना जिवे मारण्याचा धाक दाखवुन त्यांच्या जवळील १२७ सिंलेडरचे नगदी १ लाख १४ हजार ९९८ रूपये लुटुन मोटार सायकलने पिपरीच्या दिशेने प्रसार झाले .
फिर्यादीने सी तिवारी गँस एजन्सी चे मालक मुकेश तिवारी व पंकज तिवारी हयाना व पोलीसांना घटनेची माहीती दिली.कन्हान पोलीसांनी घटनास्थळ गाठुन फिर्यादी कंचन जगदीश तिवारी वय २१ वर्ष व कोमल उत्तम बोरकर वय १८ वर्ष शिवाजी नगर कन्हान यांच्या तक्रारी वरून अञात दोन २५ वयोगटातील युवा आरोपी विरूध्द कलम ३९२, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून पी एस आय प्रल्हाद धवड तपास करीत आहे .
कपुर गोडाऊन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणुन एस पी सिन्हा वय ६५ वर्ष हनुमान नगर कन्हान १० ते १३ वर्षापासून नौकरी वर आहे . सकाळी ९ ते ५ वेळ २५०० रूपयाच्या वेतनात कार्यरत आहेत.