Published On : Tue, Sep 22nd, 2020

वाडी क्षेत्रात वाढत्या करोनाचा प्रसार प्रतिबंध नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी आले एका मंचावर !

Advertisement

– दानशूर व्यक्ती च्या मदतीने करोणा उपचार केंद्र उभारण्याचा मानस,शासन-प्रशासन लक्ष न दिल्यास वाडी बंद चा ही ठराव,वाडीतील काही खाजगी डॉक्टराच्या दवाखान्या बंद चर्चेत नाराजगी

वाडी (प्र)- वाडी नगरपरिषद क्षेत्रात करोना आजार अनियंत्रित झाल्याने तसेच करुणा बाधित यांची संख्या ,मृतकाची संख्या वाढत असल्याने चिंतीत होऊन सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून जनहितासाठी एका मंचकावर येऊन शासन व आरोग्य यंत्रणेच्या सहकार्य उपाय योजना करण्याचा निर्णय रविवारी गुरुवारी दुपारी दत्तवाडी गुरुदेव सभागृहात संपन्न झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. वाडी नगर परिषद क्षेत्रात व्याहाड आरोग्य केंद्र व वाडी नप नियंत्रना साठी उपलब्ध साहित्य व मनुष्यबळात कार्यशील आहे .मात्र आतापर्यंत करोना आजाराने तसेच वेळेवर बेड ,ऑक्सिजन ,उपलब्ध न झाल्याने 23 नागरिकांचा मृत्यू झाला असून 604 करोना बाधित रुग्ण व 250 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती चर्चेत पुढे आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.

वाडीतील करोना ची गँभीर स्थिती प्रसारमाध्यमातून नागरिकापर्यंत समजताच सोशल मीडियाच्या माध्यमातून वाडीतील राजकीय पदाधिकाऱ्यावर नागरिकांनी प्रतिक्रियांचा भडिमार केला ,तसेच वाडीत करुणा पसरू नये म्हणून त्यांना व उचित सुविधा मिळावी म्हणून नेतेमंडळी काय करीत आहे असे अनेक प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केले त्या मुळे नागरिकांच्या आक्रोशाची दखल घेत वाडीतील सर्वपक्षीय नेते पक्षभेद व मतभेद विसरून या बैठकीत सामील झाले. माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह काँग्रेसतर्फे प्रकाश कोकाटे दुर्योधन ढोणे, राजेश थोराने ,अश्विन बैस.शिवसेनेतर्फे संजय अनासने ,प्रा.मधु मानके पाटील,रुपेश झाडे, राष्ट्रवादी तर्फे श्याम मंडपे,आशिष इखनकर,भाजप तर्फे केशव बांद्रे ,राजेश जिरापुरे बसपा तर्फे शशिकांत मेश्राम, नरेंद्र मेंढे ,राहूल सोनटक्के ,वंचित आघाडी तर्फे राजेश जंगले ,आशिष नंदागवळी सह वाडी पत्रकार संघाचे प्रतिनिधी प्रा.सुभाष खाकसे,कृष्णा डबरासे,सुखदेवे यांनी तीन तास चाललेल्या या चर्चेत करोणा रुग्ण, मृत्युसंख्या वाढ तसेच रुग्णांसाठी उपचार व दवाखाना भरतीची गैरसोय यावर चिंता व्यक्त करून वाडीची करोना साखळी तोडण्यासाठी 7 दिवस जनता कर्प्यु लावावा काय ?असा प्रस्ताव ठेवन्यात आला असता जनता कर्प्यु लावणे दोन्ही बाजू लक्षात घेता सध्या योग्य ठरत नसून त्याऐवजी वाडीत करोना प्रसाराची जी कारणे व वैद्यकीय उपचार सुविधा ,जागृती याची कमतरता भरून काढणे हा उपाय योग्य असल्याचे निश्चित करण्यात आले.चर्चेदरम्यान वाडीतील काही खाजगी डॉक्टर्स येथील रुग्णाच्या भरोशावर सक्षम झाले मात्र संकट काळी आपली जबाबदारी झटकून विविध कारणे दाखवून दवाखाने बंद ठेवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली तरी या डॉक्टरांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून या संकटाच्या काळात जनतेला सेवा द्यावी अशी गरज व विनंती प्रतिपादित करण्यात आली .

तसेच वाडीत नागरिकांच्या व दानशूर व्यक्तींच्या मदतीने तातडीने कोविद उपचार केंद्र निर्माण करण्याचे व त्या साठी प्रस्ताव व सहकार्य प्रशासनाला देण्याचे ठरविण्यात आले.खास बाब म्हणजे वाडी ची लोकसंख्या 1लाख असूनही येथे शासकीय आरोग्य केंद्र निर्माण करण्यात न आल्याने वाडीतील जनता आरोग्यासाठी वणवण भटकत असून महागडे उपचार घेण्यास मजबूर झाली आहे .व या बाबीवर ही शासनाचे लक्ष वेधून वाडीत तातडीने शासकीय आरोग्य केंद्र निर्माण करण्याची कार्यवाही सुरू करावी असा ठराव पारित करण्यात आला. या सर्व नियोजनाची माहिती येत्या दोन दिवसात तहसीलदार नागपूर ग्रामीण व जिल्हाधिकारी नागपूर यांना भेटून वाडीत ची स्थिती लक्षात घेता करोना उपचार केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती करण्यात येईल व शासन-प्रशासन ला लागणारी आवश्यक साहित्य, निधी ,वाडीतील दानशूर व नागरिक उपलब्ध करून देतील असा प्रस्ताव या सभेत पारित करण्यात आला .

एवढे करूनही प्रशासनाने व शासनाने योग्य पावले मदतीसाठी न उचलल्यास वाडीतील नागरिक देणगीतुन असे केंद्र उभारतील व शासन- प्रशासना नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी वाडीत एक दिवस कडकडीत बंद पाळून आपला रोष व्यक्त करतील असेही सभेत एकमताने ठरवण्यात आले. यासाठी तातडीने सर्वपक्षीय करोना निवारण कृती समितीची स्थापना देखील करण्यात आली असून याकृती समिती च्या माध्यमाने तातडीने पुढील कारवाई करून वाडीतील नागरिकांना संकटात दिलासा देण्यासाठी कार्य करेल असे निश्चित करण्यात आले.मधु मानके पाटील यांनी उपस्थिताचे आभार व्यक्त केले.