Published On : Tue, Sep 22nd, 2020

मेंढेपठार सरपंचां विरोधात अविश्वास ठराव पारित

– माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या पत्नीला धक्का

काटोल : काटोल तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाचे ठिकाण असलेल्या मेंढेपठार(बाजार) येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या घराणेशाही विरोधात आज ग्रामस्थांनी बंड पुकारात गावच्या महिला सरपंच्या दुर्गा चंद्रशेखर चिखले यांच्या विरोधात अविश्वास पारित करण्यात आला यावेळी तहसीलदार अजय चरडे उपस्थित होते.

Advertisement

मेंढेपठर(बाजार) येथील सरपंच दुर्गाताई चिखले यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस अरुणा शिवदास गजभिये यांच्यासह चंद्रशेखर सुरेश कुंभलकर,हेमंत चिंतामण इंगळे,अंजु कांतेश्वर वसू,अभय नामदेव कोहळे,रंजू डोमा सर्याम यांनी तहसीलदार काटोल कार्यालयात सरपंच विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.त्याअनुषंगाने तहसीलदार चरडे यांनी दि.२१/०९/२०२० रोजी ग्राम पंचायत कार्यालय मेंढेपठार येथे अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन दुपारी 2 वाजता करण्यात आले होते या सभेची सरपंचां सहित इतर सात सदस्यांना उपस्थिती बाबत सूचना दिल्या गेली होती. यातील दोन सदस्य सरपंच दुर्गा चिखले व सुमन मधुकर कोहळे हे सभेला गैरहजर असल्यामुळे ग्राम पंचायत शिपाई पंढरी वासुदेव सातपुते यांनी ग्रामपंचायत समोर दुपारी २.१५ ला गैरहजर सदस्यासानी २.२० पर्यंत उपस्थित राहण्यासंदर्भात पुकारा करण्यात आला.परंतु २.२० वाजेपर्यंत दोन्ही सदस्य गैरहजर असल्याने पुन्हा १० मिनिटे वाट बघून दुपारी २.३० ला विशेष सभेला सुरुवात करण्यात आली.

सर्व उपस्थित सदस्यांना अविश्वास ठरावाची नोटीस वाचून दाखविण्यात आली.ठरावातील मुद्यांवर चर्चा करण्यात आली असता उपस्थित सहा सदस्यांनी ग्राम पंचायत सरपंचावर विरोधात अविश्वासाच्या बाजून मतदान केल्याने महाराष्ट्र ग्राम पंचायत सभा बाबतचे नियम १९५९ मधील नियम २८ नुसार सरपंच दुर्गा चिखले यांच्यावरील अविश्वास ठरावा च्या बाजूने सहा सदस्यांनी मतदान केल्यामुळे हा अविश्वास ठराव पारित झाला. व पुढील कार्यवाहीसाठी सदर अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे

प्राप्त अविश्वास ठरावानुसार आज मेंढेपठार (बाजार) येथे विशेष सभा घेण्यात आली होती यात अविश्वासाच्या बाजूने सहा मते पडली त्यामुळे बहुमताने हा ठराव पारित झाला ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविण्यात आले असून जिल्हाधिकारी हे पुढील काळात ग्राम सभेचे आयोजन करतील यात जर सरपंच्यांच्या बाजूनं कमी मते पडली तर त्यांचा सरपंच पदावरून पायउतार करण्यात येईल तर याउलट जास्त मते पडली तर त्या सरपंच पदावर कायम राहतील. – अजय चरडे,तहसीलदार

काटोल शहरात पुन्हा २१ कोरोना बाधित
काटोल शहरात सोमवारला कोरोना बाधितांच्या रुग्नात वाढ झाली असून शहरात आज २१ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत यात पेठबुधवा ३,साठे नगर १,आयुडीपी १,साठोने ले आउट १,जानकी नगर १,रमन चांडक नगर ३, लक्ष्मी नगर २,गळपुरा २,शिंदे ले आउट २,घोडे प्लॉट ,पंचवटी २,अनुसूया पुरम १,खोजा ले आउट १ असा समावेश आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement