Published On : Mon, Oct 9th, 2017

मेट्रो रेल विरोधात सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन

Advertisement

नागपुर: स्थानिक सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन आम्बेडकर चौक,वर्धमानगर इथे करण्यात आले. काल आम्बेडकर चौक येथे घडलेल्या अपघातात मेट्रो रेल च्या गलथान कारभारामुळे जे गंभीर झाले होते त्यांची प्रकृति अजूनही गंभीर अस्ताना मेट्रोचे प्रशासन मौन बालगुण बसले आहेत.

सर्वपक्षीय शिष्टमंडल लकड़गंज पुलिस ठाण्यात मेट्रो रेल अधिकारी तसेच कंत्राट दारांच्या विरोधात कड़क कार्रवाई करण्याचे निवेदन दिल पण अजूनही कुठलीच कार्यवाही करण्यात न केल्यामुळे आज १ वाजता आम्बेडकर चौक येथे चक्काजाम आंदोलन करूँन सर्व रस्ते जाम करूँन प्रशासनाचे लक्ष वेधले अस्ताना अधिकारी आले,अधिकाऱ्यांसोबत नगरसेवक दुनेश्वर पेठे,नागपुर लोकसभा युवक कांग्रेस चे नगरसेवक अध्यक्ष बंटी बाबा शेळके यानी सम्बंधित अधिकाऱ्यासोबत चर्चा केलि अस्ताना अधिकाऱ्यांना खडसावून बजावले की जो पर्यन्त तुम्ही कामात नियमितता आनत नाही व् सुरक्षा प्रधान करीत नाही तो पर्यन्त चकाजाम आंदोलन करण्यात येईल तसेच इतरत्र शहरात नागरिकांना गलथान कारभारामुळे त्रास सोसावा लागत आहे कामाची सुरक्षरक्षता वाढवावी.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नगरसेवक दुनेश्वर पेठे,नगरसेवक बंटी शेळके म्हणाले की पूर्व नागपूरच्या माननीय आमदार साहेबाने अजुन पर्यन्त घटनेची दखल सुद्धा घेतली नाही,त्यानी पण या गलथान कारभाराच्या विरोधात आंदोलनात उडी घ्यावी व् मतदारसंघातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा.

नगरसेवकांनी तसेच सेकड़ो नागरिकांनी पुलिस विभागाला खडसावून सांगितले की मेट्रो च्या कंत्राटदारावर सम्बंधित अधिकाऱ्यांवर ३०२ चा गुन्हा नोंदविन्यात यावा कारण एका नागपुरी जनतेच्या जीवा सोबत खेळण्याचे काम मेट्रो रेल चे अधिकारी,कंत्राटदार करीत आहे,काम जलदगतिने व्हावे व् कंत्राटदाराला जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने भोंगळ कारभार पूर्ण शहरात मेट्रो रेल अधिकाऱ्यांच्या सोबत हाट मिळवून करीत आहे.

आजच्या चक्काजाम आंदोलनात नगरसेवक दुनेश्वर पेठे,युवक कांग्रेस अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके,नगरसेवक बाल्या बोरकर,प्रकाश राउत,अयाज भाई,गुलशन मुनियार,रविंद्र इटकेलवार,अक्षय घाटोले,अम्ब्रीश ढोरे,विज्जूभाई शेख,प्रकाश मेश्राम,पिंटू मेश्राम,गुलशन मींचानी,दीपक सलुजिया,विलास मेश्राम,बंटी फाल्के,महेश बोकलियानी,मिथुन श्रीराम,मुकेश दुपारे,मंदाबाई चंदनखेड़े,सीमा वासनिक,आशा बोरकर,उर्मिला मेश्राम,पूजक मदने,हेमंत कातुरे,आशीष लोनारकर,सौरभ शेळके,स्वप्निल बावनकर,निखिल बालगोटे इत्यादि सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आजच्या आंदोलनात सहभागी होते.

Advertisement
Advertisement