Published On : Tue, Feb 23rd, 2021

दर शनिवारी रविवारी कामठी तालुक्यातील सर्व बाजारपेठ बंद राहणार – ठाकरे

कामठी :-कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे तेव्हा .कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कामठी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारो 1 दरम्यान समस्त प्रशासकीय अधिकारि, नगर परिषद प्रशासनिक अधिकारो, नगरसेवक गण आदींचा संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत कामठी तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांच्या सहवासीयांचा शोध, मोहिमेचे नियोजन, तपासणी संख्या वाढविणे, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्पेडर तपासणी व मृत्यूसंदर्भात अन्वेषण करण्यासंदर्भात आढावात्मक चर्चा करून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वप्रथम येत्या 7 मार्च पर्यंत सर्व शाळा महाविद्यालये , शिकवनी वर्ग , प्रशिक्षण संस्था, आदींवर प्रतिबंध घालून दरम्यान दर शनिवारी व रविवारी कामठी तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बाजारपेठ , दारू दुकाने, बिअर बार, हॉटेल वर बंदी घातली .तसेच कोणतेही धार्मिक , राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमावरही प्रतिबंध लावण्याचे निर्देशित केले तसेच या कालावधीत होणारे लग्न समारभा साठी पूर्वीच आयोजकानि हॉल लॉन व्यवस्थापकोय मंडळाकडे केलेली बुकिंग रक्कम लग्न आयोजकांना मुकाट्याने परत न केल्यास संबंधित हॉल व लॉन मालकावर कायदेशीर कारवाहो करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

नागरिकांच्या बिकट परिस्थितीत असलेल्या अर्थव्यवस्थेला बळ मिळावे तसेच नागरीकांच्या मंदीर उघडणे, लग्न समारंभाची परवानगी आदी मागणीला मान देत प्रतिबंधात्मक अटी शिथिल केल्या होत्या मात्र काही नागरिकांनी प्रशासनाने सुचविलेल्या त्रिसूत्री नियमाचा पालन न करता मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, गर्दीच्या ठिकानो जाणे या सर्व वागणुकीतून कोरोनाचो दुसरी लाट पुन्हा परतली असल्याने वाढीव कोरोनावर नोयंत्रण साधण्याच्या उद्देशाने जिल्हाधोकारी रवींद्र ठाकरे यांनीं आज आढावा बैठक घेत प्रशासनोक अधिकाऱ्यांना निर्देशित केल्याप्रमाणे कामठी तालुक्यातील समस्त शाळा, महाविद्यालये , प्रशिक्षण संस्था ,शोकवणी वर्गाला 7 मार्च पर्यंत बंदी घातलो आहे मात्र ऑनलाइन तासोका घेण्यास बंदी राहणार नाहो, तालुक्यातील वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, दूध, भाजीपाला , फळे, पेट्रोलपंप व इतर आवश्यक सेवा वगळून इतर बाजारपेठ व दुकाने दर शनिवारो व रविवारी 7 मार्च पर्यंत बंद राहतील तसेच सर्व मंगल कार्यालय, सभागृह , लॉन, रिसॉर्ट ,हॉटेल, सेलिब्रेशन हॉल या ठोकानो होणारे लग्न समारंभ आयोजनास बंदी राहणार आहे , धार्मिक सभा, सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रम , क्रीडा आयोजन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर 7 मार्च पर्यंत बंदी आहे, हॉटेल बार हे 50 टक्के क्षमतेच्या बैठकीत रात्री 9 वाजेपर्यंत च सुरू ठेवता येईल .

तसेच सर्व व्यावसायिक आस्थापना मध्ये समावेशक असलेले भाजीपाला विक्रेते, सलून व्यावसायिक, किराणा दुकानदार, औषधी दुकानदार, फेरीवाले, वर्तमानपत्र विक्रेते, गॅस वितरक ,हॉटेल व रेस्टरेंट मध्ये काम करणाऱ्या व्यक्ती नि कोविड चाचण्या करणे गरजेचे आहे , सर्व पदाधिकारी यानो त्याच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मास्क वापरणे व सामाजिक अंतर पाळणे यासाठी परावृत्त करावे तसेच कोविड चाचण्या करण्यासाठी सुदधा परावृत्त करावे, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मास्क न वापरणे तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्यावर कडक कारवाही करावी, तसेच सुपर स्प्रेडर च्या कोरोना चाचणी करून घेणे , गृहविलीगी करणातील व्यक्तीचा नियमित पाठपुरावा करणे, कोविड पॉजीटीव्ह व्यक्तीचे संपर्क शोधून त्यांच्या कोविड चाचण्या घेणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र स्थापित करून त्यांचे नियंत्रण करणे आदींचे निर्देश दिले याप्रसंगी उपस्थित जी प नागपूर च्या स्थायो समिती सदस्य प्रा अवंतीका ताई लेकुरवाडे, जी प चे विरोधो पक्ष नेता अनिल निधान, कामठी नगर परिषद च्या भाजप नगरसेविका सुषमा सीलाम, नगरसेवक प्रतीक पडोळे, नगरसेवक संजय कनोजीया आदीनो कोरोना काळात होणाऱ्या वैद्यकीय असुविधे बाबतचा तक्रारीचा पाढा वाचला यावेळी तालुक्यातील समस्त खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दरपत्रक लावण्याचे फर्मान सोडले.


या आढावा बैठकीत एसडीओ श्याम मदनूरकर, तहसिलदार अरविंद हिंगे, बीडीओ अंशुजा गराटे, नगराध्यक्ष मो शाहजहा श फाअत, उपाध्यक्ष , माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान, नगरसेवक नीरज लोणारे, मो आरोफ कुरेशी, कामठी पंचायत समितो चे सभापतो उमेश रडके, उपसभापती आशिष मललेवार आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी