Published On : Tue, Feb 23rd, 2021

कोविड-19 प्रतिबंधात्मक दंड वसुली

Advertisement

संयुक्त भरारी पथका द्वारे ग्रा.पं.खैरी हद्दीतील कार्यवाही .

कामठी : महिन्याच्या काळ लोटून ही कोविड-19 आटोक्यात येत नसून नुकताच वारेगाव खापरखेडा रस्त्याचे बंधकाम सुरू असल्यामुळे खापरखेडा कामठी रस्त्यावरील आवागमन संपूर्णपणे खैरी गावातून होत आहे कोविड 19 च्या संपूर्ण नियमाला तिलांजली देत दुचाकी चारचाकी वाहन धारक बिन धाक मास्क विना सोशल डिस्टन्स च्या नियम धाब्यावर ठेवत आवागमन करीत आहे कोरोणा महामारीच्या गंभीर परिस्थितीचा पाहून खैरी येथील सरपंच बंडू कापसे यांनी गाव पूर्ण कोरोना मुक्त असावे यासाठी प्रयत्नशील आहे परंतु

या बाहेरील आव तून होणाऱ्या आव आगमनामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याची जाणीव सरपंच बंडू कापसे यांनी तहसीलदार अरविंद हिंगे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांना परस्पर भेट देत करून देत मदतीचे आवाहन केले त्यानुसार खैरी गावातील परिसरातील पान टपरी,लॉंन,हॉल,बार व कारखान्यांवर वरप्रशासन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त रुपाने धाड टाकण्यात आली कारवाईदरम्यान दुचाकी चार चाकी पान टपरी लोन हॉल बार व कारखान्यावर विना मास्क व सामायिक अंतर सेंटर याचा वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंडात्मक 16 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला
या भरारी पथकामध्ये कामठी तहसील चे नायब तहसिलदार श्याम कवठी,कामठी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी श्रीकांत भीष्णुरकर खैरी ग्रा प चे सचिव देवगडे ,प.स. चे सचिव वीरेंद्र ठवरे, सरपंच बंडू कापसे नवीन पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत तांडेकर,ग्रा.पं. खैरी चे लिपिक नितेश मानकर, वाहनचालक युवराज चौधरी आदींनी ही कारवाई पार पडली

संदीप कांबळे कामठी