Published On : Sat, Sep 14th, 2019

अखिल माळी समाजाचे महाअधिवेशन सोमवारी

माळी समाजाच्या समस्यां सोडविण्यासाठी लोकजागर.

नागपूर : महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने हिरक महोत्सवा निमित्त अखिल माळी समाजाचे अधिवेशन १६ सप्टेंबर रोजी, रेशिमबाग येथे कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग येथे घेण्यात येणार आहे. या निमित्ताने माळी समाजाच्या समस्यांचा लोकजागर केला जाणार असून या अधिवेशनाला केंद्रीयमंत्री मा.नितीन गडकरी, राजस्थानचे मुख्यमंत्री मा.अशोक गहलोत, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मा. केशवप्रसाद मौर्य, डॉ. अमोल कोल्हे, खासदार, माजी मा.उपमुख्यमंत्री छगनजी भुजबळ यांना प्रामुख्याने निमंत्रित केले आहेत. समाजाचे मंत्री, आमदार तसेच वेगवेळ्या हुद्यावर असलेले अधिकारी, समाजसेवक यानांही पाचारण करण्यात आले आहे. अधिवेशनात विविध माळी, सैनी कुशवाह, मौर्य, शाख्य संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महात्मा फुले शिक्षण संस्थेने ६० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आज संस्थेशी रेशिमबाग, नागपूर येथे भव्य वास्तु उभी आहे. त्यात संस्थेचे सांस्कृतिक सभागृह, महिला कर्मचारी वसतीगृह, आय.टी.आय, ३ डी अनिमेश कोर्सस , सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका चालविले जात आहे.

संस्थेच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. हिरक महोत्सवाच्या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्रित होत आहेत. माळी समाज मोठया प्रमाणात शेती करतो तो अजुनही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासला आहे. राजकियदृष्टयाही उपेक्षित आहे. महाराष्ट्रात ओबीसीमध्ये कुणबी समाजानंतर माळी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. समाज फारसा संघटित नसल्याने कुठलाच राजकीय पक्ष या समाजाची फारशी दखल घेतांना दिसत नाही व उपेक्षित ठेवल्या जाते. सत्तेतही फक्त तोंडी लावण्यापुरता वाटा दिला जातो. अधिवेशनाच्या निमित्ताने समाजातील आर्थिक, शैक्षणिक, शेतकी तसेच विविध प्रश्नांवर उहापोह करण्यात येणार आहे.

याकरिता १५ सप्टेंबरला, रविवारी, महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात समाजाच्या प्रतिनिधींची सभा घेण्यात येणार आहे. अधिवेशनात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे भारत रत्न द्यावे , महात्मा फुले यांच्या पुणे येथील पहिली शाळा भिडे वाड्याचा जीर्णोधार करावा, रामाजाच्या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी सरकारने सर्वांगीन धोरण आखावे, संत्रा उत्पादक व शेतक-यांना भरीव मदत करावी, राजकीय सत्तेत वाटा द्यावा आदी मागण्या सरकारकडे केल्या जाणार आहेत. अधिवेशनाला हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होतील.

महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष् प्रा.अरुण पवार त्यांच्या सर्व पदाधिका-यासंह माजी आमदार अशोकराव मानकर, आमदार नागो गाणार, महादेवराव श्रीखंडे, सर्व नगरसेवक, महाराष्ट्रातील सर्व आजी माजी खासदार, आमदार, उद्योगपती, व्यापारी, पत्रकार व सर्व संस्थेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आयोजन समिती तयार करण्यात आली असून हे महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहे. पत्रपरिषदेत माहिती देण्यात आली.

यावेळी पत्रपरिषदेला उपस्थिती प्रा.अरुण पवार, मा. माजी आमदार अशोकराव मानकर सर्वश्री महादेवराव श्रीखंडे, डी.शेषराव उमप, गुलाबराव चिचाटे, नाना भाऊलोखंडे, सुरेन्द्र आर्य, रविन्द्र अंबाडकर, रमेश राऊत, प्रकाश देवते, विनायक गवडी, धनराज फरकाडे , मुकेश घोळसे, अरुण भोयर, शरद चांदारे, गिरीष देशमुख, निलय चोपडे, घनश्याम खवले, राजु गाडगे, राजेन्द्र पाटील, विजय भोयर, सुनिल चिमोटे , शंकर घोळसे, डॉ. मुंजुषा सावरकर पत्र परिषदेमध्ये प्रमुख्याने उपस्थित होते.