Published On : Sat, Sep 14th, 2019

पेच जलाशयातील जलसाठा ओव्हरफ्लो

Advertisement

14 गेट उघडले

रामटेक -नवेगाव खैरी येथील पेंच जलाशयातील जलसाठा ओव्हरफ्लो झाल्यामुळे पेंच नदीपात्रात शुक्रवारी १३ सप्टेंबर ला पाणी सोडण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील चौराई धरणातील जलसाऊ तेथील अतवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने तेथील पाणी तोतलाहडोह धरणात येणे सुरू असल्याने तोतलाहडोह धरण ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे १४ दरवाजे 0.३0मी ११ सप्टेंबर २0१९ बुधवारी उघडे केले. त्यामुळे नवेगाव खैरी पेंच धरणातसुद्धा जलसाठा अधिक वाढून पेंच नदीच्या पात्रात पाणी विसर्जित केले.

त्यानंतर दुपारी चार दरवाजे बंद करून दहा दरवाजे सायंकाळी सुरू होते. मात्र, पाण्याचा साठा वाढत असल्याने पुन्हा नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांनंतर धरणात पाणीसाठा वाढून नदीला पूर आल्याने दर्शकांची दिवसभर गर्दी होती. मात्र, रात्री पेंच धरणावर पथदिवे बंद असल्याने सर्वत्र काळोख पसरल्याचे दिसत होते. नदीच्या काठी असलेल्या गावातील नागरिक व मासेमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. पेंच प्रकल्प नवेगाव खैरी येथे जलसाठा वाढल्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे चित्र निदर्शनास आले .