Published On : Sun, Sep 10th, 2017

समाजाच्या उद्धारासाठी सर्व बांधवांनी संगठित व्हावे – व्ही. विश्वनाथन

नागपूर: प्रत्येक क्षेत्राचे आधुनिकीकरण झाले असल्याने या स्पर्धेच्या काळात परंपरागत कारीगर व्यवसाय करणाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सुवर्णकार, लोहकार, कष्टकरी, कसार, शिल्पी, कुंभार, बसोड आदी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावे, त्याशिवाय अनेक दशकांपासून कायम असलेल्या समस्यांवर तोडगा निघणार नसल्याचे आर्टिजन वेलफेयर ऑर्गनाएझेशनचे संस्थापक (दिल्ली) व्ही. विश्वनाथन यांनी सांगितले.

पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कामगारांना शासकीय संरक्षण मिळावे, स्वतंत्र कारीगर मंत्रालयाची स्थापना करावी, प्रत्येक राज्यात कारीगर कल्याण बोर्डचे गठन करण्यात यावे आदी मागण्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. यासोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ वास्तविक लाभार्थ्यांना मिळावा या संबंधित कार्य योजना नियोजनासाठी आज (ता. 10 सप्टेंबर) रोजी रामेश्वरी चौक येथील लोहार समाज भवन येथे महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

प्रामुख्याने आर्टिजन वेलफेयर ऑर्गनाएझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एन. हिवलेकर, राष्ट्रीय महासचिव रामचंद्र येरपुडे, भारतीय सुवर्णकार समाज, नागपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मीकांत सोनी, आर्टिजन वेलफेयर ऑर्गनाएझेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष (बंगळूर) के. वसंत कुमार, राष्ट्रीय सचिव विनायक करोले, राष्ट्रीय सचिव प्रभारी अरविंद हाडे, सोनी समाज मित्रमंडळाचे अध्यक्ष अशोक सोनी, माळवी सुवर्णकार संस्थचे माजी अध्यक्ष कृष्णराव चांबोळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना व्ही. विश्वनाथन म्हणाले, कारीगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या हक्काच्या लढाईसाठी प्रत्येकाला सज्ज व्हायचे आहे. ज्यांना समाजातील मुख्य प्रवाहापुसन वंचित ठेवण्यात येते त्यांच्यासाठी आर्टिजन असून सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली आहे.

सर्वांनाच्या हक्कासाठी, विकासासाठी आणि उद्धारासाठी या व्यासपीठाच्या सुरुवात करण्यात आली आहे. सर्वांनी संघठितपणे सरकारवर दबाव आणल्यास प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण करून समाज बांधवांचा विकास सहज शक्य होईल असे प्रबोधनामतक मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात देशभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या स्वागताने झाली. नंतर सर्व उपस्थितांनी आपले परिचय दिले. कार्यक्रमाचे संचालन आणि उपस्थितांचे आभार आर्टिजन वेलफेयर ऑर्गनाएझेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (जालना) साहेबराव पोपळघट यांनी मानले.