Published On : Sun, Sep 10th, 2017

टोल नाक्याचे छप्पर झाले धोकादायक

वाडी(अंबाझरी):- टोल नाक्यावर वाहन चालकाकडून टोल ची वसुली केल्या जाते, परंतु आवश्यक सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे वाहन चालकांना टोल वर जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागते, वाडीतील तीनही टोल ची छते क्षतीग्रस्त झाल्याचे दिसून येते, याला बांधकाम विभागाची डोळे झाक म्हणावे की ठेकेदारांची कंजूशी यावर प्रश्न निर्माण होत आहे.

वाडी मध्ये तीन टोल नाके असून त्याचे छप्पर केव्हा पडेल याचा अंदाज नाही, वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी टोल नाक्याची पाहणी केली असता “टोल चा झोल दिसून आला” एम आय डी सी कडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहना कडून टोल टॅक्स घेतल्या जातो तेथील दोन्ही तोल टॅक्स ची स्थिती गंभीर आहे काटोल रोड वरील टोल नाका याच स्थितीत आहे, पथकर विभाग मरारवी महामंडळ मार्यदित मुंबई टोल नाका यांच्या अधिपत्या खाली चालविल्या जात आहे.

ज्याचा ठेका धुळे येथील सर्वेनिअर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला दिला आहे, दहा वर्षा पासून सुरू असलेल्या या टोल वर वाहन चालका कडून टोल वसूल केल्या जात आहे, परन्तु सुविधेच्या अभावामुळे वाहन चालक नाराजी व्यक्त करीत आहे, येथील कर्मचार्यांन करिता बैठक व्यवस्था पुरेशी नाही, टोल नाक्यावर पत्र्याचे छत लावले आहे, ते क्षतिग्रस्त झाल्यामुळे केव्हा पडेल अशी भीती वाहन चालक व कर्मचार्यांही वाटत आहे, टोल ला मजबूत बनविण्यासाठी कंपनी ने अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलले नसल्यामुळे धोकादायक शेड च्या खालीच काम सुरू आहे.

वादळी पाउसा मुळे टोल अक्षरशः हलायला लागतो, छतावरील पत्रे केव्हाही पडू शकतात येथील कर्मचाऱ्यांना या धोका दायक स्थितीचा सामना करावा लागतो, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्ये कडे लक्ष देणे गरजेचे आहे एखादी अनपेक्षित दुर्घटना होण्याच्या पूर्वी टोल नाक्याच्या छताची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक करीत आहे.