Published On : Sat, Jun 3rd, 2023

नागपूरच्या अल्फियाने पटकावले सुवर्णपदक ; खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये केली उत्कृष्ट कामगिरी

Advertisement

नागपूर : हेवीवेट प्रकारातील देशातील टॉप-रेट बॉक्सरपैकी एक अल्फिया खान पठाण हिने शुक्रवारी नागपूर विद्यापीठासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली महिला ठरली असून तिने इतिहास रचला आहे.

माजी युवा विश्व चॅम्पियन अल्फियाने शुक्रवारी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकत नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना, अल्फियाने गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश येथे झालेल्या +81 किलो गटाच्या अंतिम फेरीत चौधरी रणबीर सिंग विद्यापीठाच्या स्वातीचा 5-0 असा पराभव केला.

2018 मध्ये खेळो इंडिया स्कूल गेम्समध्ये नागपूरस्थित आंतरराष्ट्रीय बॉक्सरची पहिली उपस्थिती होती, जिथे तिने +81 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. अल्फियाने यापूर्वी जागतिक युवा बॉक्सिंगमध्ये विजेतेपद आणि आशियाई महिला चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.