नागपूर/कन्हान: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गास टेकाडी बस स्टाप च्या समोर नागपुर शहर बॉयपास चारपदरी रस्ता जोडण्यात आलेला असुन हा रस्ता पुढे मनसर पर्यंत बनविण्यात आलेला आहे. या चारपदरी रस्ता च्या बाजुला तुटक सर्व्हिस रस्ता बनवुन सर्व्हीस रस्ता पुर्ण बनविण्यात न आल्याने, सर्विस रोड वगळण्यात आल्याने अपघातास आमंत्रण देऊन अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
टेकाडी बस स्टाप च्या समोर नागपूर शहराचा चारपदरी बॉयपास रस्ता नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ला जोडण्यात आला आहे. सध्या ऑटोमोटिव्ह चौक नागपूर ते टेकाडी बस स्टाप बहुपदरी सिमेंट रस्ता निर्माण काम सुरू असुन हा सिमेंट रस्ता नागपुर बॉयपास चारपदरी रस्ताला जोडण्यात आल्याने टेकाडी व कन्हान शहराकडुन मनसर कडे जाणारे वाहन सरळ जोड रस्त्यावर आमोरासामोर येत असल्याने अपघाताला आमंत्रण देत असतात.
यामुळेच येथे झालेल्या अपघातात निर्दोष दोन लोंकाचा घटना स्थळीच मुत्यु झाला आहे. यास्तव या जोड रस्त्यापासुन तर तार कंपनी चौका पर्यंत सर्व्हिस रोड पुर्ण बनविण्यात यावा. जेणे करून कन्हान शहर व टेकाडी कडुन येणारे वाहन सर्व्हिस रस्त्याने तार कंपनी चौकातुन आपल्या बाजुला सुरळीत होऊ शकेल. आणि या ठिकाणी होणारे अपघात कमी होतील. तसेच मनसर पर्यंत जे तुटक सर्व्हिस रोड आहे ते सुध्दा पुर्ण बनविण्यात यावे. तसेच कंत्राटदारांच्या अपुऱ्या कामामुळे निर्दोष लोकांचा अपघातात बळी जात असल्याने दोषीवर सुध्दा योग्य कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी परिसरातील शेतकरी, नागरिक, महासचिव बी.आर.एस.पी. विशेष फुटाणे, माजी टेकाडी पं.स.सदस्य पंढरी बाळबुधे, भगवानदास यादव, सुरेश हुड, विशाधर कांबळे, गणेश हुड, वंसतराव कांबळे ग्रा.प.सदस्या सिंधुताई सातपैसे, मायाताई मनघटे, सुरेखा कांबळे आदीने केली आहे.