Published On : Fri, May 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

एसबीआय ग्राहकांसाठी अलर्ट! सलग सहा दिवस शाखा सेवा ठप्प राहण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २३ मेपासून पुढील सहा दिवस अनेक ठिकाणी बँक शाखांचे कामकाज प्रभावित होण्याची शक्यता असून, ग्राहकांनी अत्यावश्यक व्यवहार आधीच पूर्ण करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२३ मे हा महिन्याचा चौथा शनिवार तर २४ मे रविवार असल्याने या दोन दिवसांत नियमित सुट्टीमुळे शाखा बंद राहणार आहेत. त्यानंतर २५ आणि २६ मे रोजी एसबीआय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिल्याने बँक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कर्मचारी संघटनांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत फंड व्यवस्थापकांची भरती, कामाचे वाढते आउटसोर्सिंग, वेतनातील तफावत, पदोन्नती प्रक्रिया आणि एचआरएमएस व्यवस्थेतील अडचणी यांसारख्या विविध मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, २७ आणि २८ मे रोजी बकरी ईदच्या निमित्ताने देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार काही राज्यांमध्ये २७ मे तर काही भागांत २८ मे रोजीही बँका बंद राहतील. जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही दिवशी सुट्टी असणार आहे.

सलग सुट्ट्या आणि संपामुळे शाखांमधील रोख व्यवहार, धनादेश क्लिअरन्स आणि इतर प्रत्यक्ष सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत आर्थिक नियोजन करून आवश्यक कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.

तथापि, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय सेवा आणि एटीएम सुविधा नियमित सुरू राहणार असल्याने डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे एसबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement