नागपूर: पुज्यपद परमहंस योगमूर्ती श्री जनार्दन स्वामी यांच्या शतकोत्तर रजत जयंती वर्षा निमित्त अखिल भारतीय योग संमेलनाचे दिनांक १७ नोव्हेंबर ला आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रामनगर येथील संघ मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.आज या सभा मंडपाचे विधिवत पूजन आमदार डॉ.परिणय फुके व नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांच्या हस्ते पार पडले. या वेळी नगरसेवक अमर बागडे,जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे गुरुजी, मंडळाचे अध्यक्ष सुनील सिर्सीकर, मिलिंद वझलवार प्रामुख्याने उपस्तिथ होते.
तीन दिवस चालणाऱ्या या योग संमेलना मध्ये विविध विषयावरती विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.यामध्ये योगशास्त्र, प्रात्यक्षिक अभ्यास, प्रवचन, प्राणायाम, योग चर्चा, आसन, ध्यानादी अष्टांग योग, शुद्धिक्रिया, ज्ञान साधना आदी विषय या संमेलनाची वैशिष्ट्य राहणार आहेत.हे योग संमेलन सकाळी ४.३० वाजता पासून सुरु होऊन रात्री १० पर्यंत सतत चालणार आहे.
या मंडप पूजन प्रसंगी प्रशांत राजूरकर, अनिल नाजपांडे, नंदकिशोर जोशी, राहुल कानिटकर, संदीप रेचे, सुशील कदम, स्वप्नील भोसकर, भारती कुसरे, सीमा मुजुमदार, वासंती शर्मा, स्वाती राजूरकर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
