Published On : Thu, Dec 27th, 2018

अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा लोकल ट्रेनचा प्रवास

सीएसएमटी ते डोंबिवली असा एक तासाचा केला प्रवास…

मुंबई: विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज संध्याकाळी लोकल ट्रेनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली असा प्रवास केला.

डोंबिवली येथे एका कार्यक्रमाला कारने जाण्यासाठी ट्रॅफिकचा अडथळा येवू शकतो त्यामुळे कार्यक्रमाला वेळेत पोचता येणार नाही हा विचार करुन अजितदादा पवार यांनी लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रकाश गजभिये, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते.