Published On : Wed, Jan 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अजितदादांना हातातील घड्याळ आणि गॉगलवरून ओळखलं; प्रत्यक्षदर्शींनी सांगितले भीषण अपघाताचे थरारक किस्से

Advertisement

बारामती – सकाळचे पावणे नऊ वाजले असताना, अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंगचा वेळ जवळ येत होता. मात्र नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. हवामान आणि परिस्थिती लँडिंगसाठी अनुकूल नव्हती, त्यामुळे विमानाने घिरट्या घेण्यास सुरुवात केली.

पण ते विमान शेवटी विमानतळाच्या अगदी जवळ असलेल्या शेतात कोसळलं आणि जोरदार स्फोट झाला. महाराष्ट्राच्या कामाच्या माणसाच्या, ‘अजितदादाच्या’ मृत्यूची दु:खद घटना घडली.

Gold Rate
28 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,64,400/-
Gold 22 KT ₹ 1,52,900 /-
Silver/Kg ₹ 3,72,000 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रत्यक्षदर्शींनी अनुभवलेले दृश्य इतके भयानक होते की ते ऐकून कोणीही सुन्न होणार आहे.

घटनास्थळी धावलेल्या एका महिलेने सांगितले की, विमानाने प्रथम एकदा घिरटी घेतली, मग दुसऱ्यांदा घिरट्या मारत खालून खोल जाऊन कोसळलं आणि भयंकर स्फोट झाला. तिने ताबडतोब फोन करून विमानतळाचे कर्मचारी आणि पोलिसांना खबर दिली, मात्र स्फोट इतका प्रचंड होता की कोणीही त्वरित मदत करू शकले नाही. नंतर अग्निशमन दल पोहोचले.

दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं की, तेव्हा तो अपघात झालेला परिसर बादलीने पाणी आणण्याच्या कामात व्यस्त होता. साईडला एक उडालेली, फुगलेली मृतदेहाची बॉडी पडली होती. त्यांनी त्या बॉडीला ब्लँकेट देऊन पोलिसांना सुपूर्द केलं.

तिसऱ्या प्रत्यक्षदर्शीच्या मते, सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान कोसळलं आणि लगेच दोन मृतदेह बाहेर फेकले गेले. चेहरा ओळखणे अशक्य होते. मात्र त्यांनी विमानातील एका व्यक्तीला हातातील घड्याळ आणि गॉगल पाहून ओळखलं. तेच अजितदादा होते. त्यांनी पहिल्या त्या बॉडीला ओळखून काढलं.
हे विमान विमानतळावर केवळ काही मिनिटांत उतरणार होतं, पण दुर्दैवी अपघातामुळे महाराष्ट्राने आपलं एक मोठं नेतृत्त्व गमावलं आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement