Published On : Wed, Mar 25th, 2020

‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी अजित पवारांनी उभारली

उपमुख्यमंत्र्यांचा कृतिशील संदेश

मुंबई : कोरोना विरोधात लढण्याची… जनजागृतीची… ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उभारली.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन… शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरगुती स्वरूपात गुढी उभी करून अशाच पद्धतीने गुढी उभारण्याचा कृतिशील संदेश राज्यातील जनतेला दिला आहे.

राज्यातील जनतेने कोणतीही गर्दी न करता घरगुती स्वरूपात आपला गुढीपाडवा सण साजरा करून मराठी नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.