Published On : Fri, Aug 9th, 2019

लक्ष्य, महत्वाकांक्षा आणि जिद्द यांच्याशिवाय यश मिळत नाही’

रामटेक: विपरीत परिस्तिथीवर मात करून जीवनाशी संघर्ष करून, लक्ष्य महत्वाकांक्षा आणि जिद्द या गोष्टींशीवाय यश मिळत नाही. उंच भरारी मारण्यासाठी एक ठराविक लक्ष्य असावे लागते. आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून स्वतःला जिद्दीने घडविले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देशासाठी प्रोडकटिव्हीटीचे कार्य करावे असे प्रतिपादन माजी आमदार, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष तसेच विद्यासागर शिक्षण संस्थेचे अध्यक माजी आमदार ऍड. आशिष जयस्वाल यांनी केले. विद्यासागर कला महाविद्यालयाच्या 20 व्या स्थापना दिनाच्या तसेच 9 ऑगस्ट क्रांतिदिन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

विद्यासागर कला महाविद्यालयाच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाली असून 9 ऑगस्ट 1999 मध्ये स्व. डॉ विनोद कुमार जयस्वाल यांनी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली.20 वर्षात महाविद्यालयायाने स्पृहणीय अशी गुणात्मक कामगिरी केलेली आहे.

या निमित्ताने बी. ए. च्या विद्यापीठ परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या 20 विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व ग्रंथभेट देऊन श्री आशिष जयस्वाल सचिव श्रीमती अनिता जी जयस्वाल यांचे हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पिल्लई यानी भूषविले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ गिरीश सपाटेनी प्रस्थाविकातून भूमिका मांडली. डॉ सावन धर्मपुरीवर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. अनिल दाणी यांनी आभार मानले.

याप्रसंगी सर्व प्राद्यापक वर्ग , शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.