Advertisement
नागपूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
यावेळी सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, अग्निशमन विभागाचे सुनील राऊत, दिलीप तांदळे यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.