Published On : Fri, May 31st, 2019

१० दिवसात: 105 टुल्लू पंप विविध ठिकाणांहून जप्त

Advertisement

१० झोनमध्ये चमू पोलीस सरक्षण मध्ये सक्रीय

नागपूर: नागपुरातील उन्हाचा पारा 47 डिग्रीच्या आसपास पोचलेला आहे. अशावेळी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करत असल्याचे चित्र दिसून येते. अशातऱ्हेने हे लोक इतरांसाठीचे पाणी हिसकावून घेत असतात. हे केवळ बेकायदेशीरच नसून अनैतिकदेखील आहे. बूस्टर पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते.

Gold Rate
07 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,49,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा पाणीपट्टी दर उपविधीनुसार बूस्टर पंप अथवा तत्सम उपकरण वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

यावर्षी, मनपा-OCWने बूस्टर पंप वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई तसेच नळजोडणी स्थगितीची कारवाई करण्याचे ठरवले आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि, नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी बूस्टर पंपाचा सर्रास वापर होणारे भाग ओळखून ठेवलेले आहेत. झोन-निहाय विशेष चमू घरावर छापा मारणे, पंप जप्ती व कायदेशीर कारवाईसाठी तक्रार नोंदवणे या कामी लावण्यात आलेल्या आहेत.

येथे उल्लेखनीय आहे कि, नुकत्याच सुरु झालेल्या पंप जप्ती मोहिमेच्या अंतर्गत मनपा-OCWने जवळपास १०५ पंप जप्त केले आहेत. हे पंप लक्ष्मि नगर: १२, धरमपेठ: ० , हनुमान नगर: १, धंतोली: १८ , नेहरू नगर: ४, गांधीबाग: ६ , सतरंजी पुरा: १५ , लकड गंज: १२, , आसी नगर: ३४ आणि मंगळवारी झोन: ३ मधून जप्त करण्यात आले आहेत

Advertisement
Advertisement