नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या मागण्यांसाठी विदर्भ राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलन अधिक तीव्र करत काही कार्यकर्ते रस्त्यावर बससमोर आडवे झोपले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत असून, तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. स्वतंत्र विदर्भ राज्य आणि शेतकरी प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विदर्भ राज्य समितीने दिला आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





