| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 1st, 2019

  भीमा कोरेगाव च्या विजयस्तंभाला अॅड. सुलेखाताई कुंभारे अभिवादन वाहणार

  कामठी:- पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 रोजी 500 महार सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवून 28 हजार पेशव्यांचा अंत केला होता या ऐतिहासिक घटनेला आज 1 जानेवारी 2019 रोजी 201 वर्ष पूर्ण होत आहेत .

  या लढाईत ज्या महार सैनिकांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारा प्रेरणादायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी व भीमा कोरेगाव 201 व्या शौर्य दिनानिमित्त राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यां व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे आज 1 जानेवारी ला भीमा कोरेगाव ला भेट देत विजयस्तंभास अभिवादन वाहणार आहेत.

  मागच्या वर्षी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या 200 व्या समारोहा निमित्त भीमा कोरगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भीम सैनिकांवर दगडफेक करून वाहनांची जाळपोळ करनाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करीत भीमा कोरेगाव विजय स्तंभाजवळील अतिक्रमण हटवून तेथे भेट देणाऱ्या अनुयायाकरिता मुलभूत सुविधा त्वरित शासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणीला रेटून धरत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घातली होती.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145