Published On : Tue, Dec 11th, 2018

झाडांवरील जाहिरातींचे फलक काढले

मनपा-ग्रीन व्हिजीलची मोहीम : ४३ जणांना दिले नोटीस

नागपूर : शहरातील झाडांवर लागलेल्या जाहिरातींचे फलक काढण्याचा उपक्रम मनपाने हाती घेतला. यात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजीलने मोलाची साथ देत या मोहिमेत पुढाकार घेतला.

Advertisement

ही अभिनव मोहीम मंगळवारपासून मनपाने हाती घेतली असून धरमपेठ झोनमधून त्याची सुरुवात करण्यात आली. उद्यान विभागातील मार्गदर्शक सुधीर माटे आणि वृक्ष निरीक्षक अनंता नागमोते यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचा उद्यान विभाग आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. पहिल्याच दिवशी धरमपेठ झोनअंतर्गत गोकुळपेठ मार्केट ते चिल्ड्रन ट्राफिक पार्क, शंकर नगर ते बजाज नगर चौक या भागातील झाडांवर लागलेले जाहिरात फलक काढण्यात आले. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी म्हणाले, झाडांना खिळे ठोकल्यामुळे झाडांमधून जेथून अन्न आणि पाणी प्रवाहित होते त्या भागाला नुकसान पोहचते. झाड ही आपली संपत्ती आहे.

निसर्गाचा समतोल टिकविण्याचे महत्त्वाचे कार्य ही झाडे करतात. त्यामुळे नागपूरकरांनी आपली जबाबदारी ओळखून झाडांना फलकमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मोहिमेत उद्यान विभागाचे मार्गदर्शक सुधीर माटे, वृक्ष निरीक्षक अनंता नागमोते, गुणवंता पिंपळकर, झडू मोहाडीकर, मनपा धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, दीनदयाल टेंभेकर, श्री.अ. खोडसकर, राजेंद्र शेट्टी, संदीप खोब्रागडे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, कार्तिकी कावळे, दादाराव मोहोड आदी उपस्थित होते.

४२ जाहिरातदारांना देणार नोटीस
झाडांवर आपल्या उत्पादनाच्या, संस्थेच्या जाहिरातींचे फलक ठोकणाऱ्या आणि शहर विद्रुप करणाऱ्या ४२ जणांना मनपाच्या उद्यान विभागातर्फे नोटीस बजावण्यात येणार आहे. झाडांवर जाहिराती लावणे हे महाराष्ट्र प्रोटेक्शन ॲण्ड प्रिझर्व्हेशन ऑफ ट्री ॲक्ट १९७५ नुसार गुन्हा आहे. त्यामुळे मनपाने उघडलेल्या या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. स्वत: झाडांवर जाहिरात फलक लावू नये व इतरांना परावृत्त करावे, असे आवाहन श्री. सुधीर माटे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement