पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे मिळाला निधी
नागपूर: महानगर पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या हुडकेश्वर आणि नरसाळा या भागातील 8 रस्त्यांच्या कामांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरात्थान महाअभियानांतर्गत 3 कोटी 20 लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी मान्यतेचे परिपत्रक जारी केले आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी मंजूर झाला आहे. विधानसभा निहाय अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून नरसाळा हुडकेश्वर क्षेत्रातील मंजूर 1 कोटी 60 लाख तसेच महापालिकेचा 50 टक्के 1 कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 29 मौजा हुडकेश्वर नागबाबा लेआऊट आणि सोळंकी लेआऊट भागातील रस्त्यांचे खडीकरण, कडूनगर आणि वैद्य लेआऊट भागात खडीकरण रस्ता बनविणे, सद्गुरुनगर भागात रस्त्याचे खडीकरण, गुरुमाऊली सुपर बाजार यांच्या घरापासून खडतकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण, दुबेनगर ‘ई’ येथे डमकनवार यांच्या घरापासून सोनकुसरे यांच्या घरापर्यंत, निमजे यांच्या घरापासून काकडे यांच्या घरापर्यंत आणि शेंदरे यांच्या घरापासून लाकेवार यंच्या घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरकरणे, मारोतीनगर आणि जयभोले हाऊसिंग सोसायटी भागात रस्त्याचे खडीकरण, विठ्ठलवाडी येथे वेडेकर यांच्या घरापासून पवार यांच्या घरापर्यंत खडीकरणासह डांबरीकरण, मौजा नरसाळा अंतर्गत राधारमण कॉलनी येथील सिमेंट काँक्रीट रस्ते बनविण्याचे काम या निधीतून होणार आहे.