Published On : Mon, Jul 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

सीओसी केंद्रातून प्रशासनाचा शहरावर ‘वॉच’ पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज

Advertisement

नागपूर, : नागपूर शहरात पावसाळ्यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर अर्थात सीओसी केंद्र सज्ज आहे. या केंद्राद्वारे पावसाळी समस्यांचे निराकरण करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम केले जात आहे, ज्यामुळे नागपूरकरांना उत्तम सोयी-सुविधा मिळत आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवार ७ जुलै रोजी सकाळपासून नागपूर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता पहाटेपासूनच कर्मचाऱ्यांचे नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सीओसी केंद्रातून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. आणि श्री. अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे.

पावसामुळे उद्भवणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्यांकडे संपूर्ण लक्ष देण्यात आले. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर मधून शहराच्या प्रत्येक हालचालीवर निगराणी ठेवण्यात आली. त्यामुळे ज्या चौकांमध्ये पाणी साचले, तिथे तात्काळ कर्मचाऱ्यांची पथके पाठवून पाण्याचा निचरा करण्यास मदत करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता कमी झाली आणि नागरिकांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, सीओसी सेंटरमध्ये विविध विभागांचे चमू समन्वयाने काम केले. यामध्ये ग्रिव्हिएन्स कॉल सेंटर (तक्रार निवारण कॉल सेंटरचे) चमू, स्वच्छ विभाग चमू, परिवहन विभाग चमू आणि स्मार्ट सिटी चमू यांचा समावेश आहे. हे चमू आपापल्या क्षेत्रातील समस्या त्वरित सोडवण्यासाठी तत्पर आहेत, ज्यामुळे शहरातील नागरिकांना जलद सेवा मिळत आहे.

यासोबतच अग्निशमन विभागाच्या प्रादेशिक आपत्ती मुख्य निवारण कक्षाद्वारे शहरात घडणाऱ्या आगीच्या घटना, झाडे उन्मळून पडणे किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. नागरिकांच्या प्रत्येक फोनला उत्तर देत त्यांच्या समस्यांची दाखल घेण्यात आली, तर शहरात लावण्यात आलेल्या विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आपत्कालीन घटनास्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पोहोचवणे आणि योग्य उपाययोजना करणे सोपे झाले.

नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कर्मचारी

नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. यामुळे, दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर तातडीने लक्ष दिले जात आहे. त्यांचे निराकरण केले जात आहे. नागरिकांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे.

नागरिकांच्या सेवेत मनपा तत्पर..

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (मनपा मुख्यालय) : 101 / 0712-2567777 / 2567029

आपत्ती नियंत्रण कंट्रोल रूम : 7030972200

लक्ष्मीनगर झोन क्र. : 0712-2245833/9130616734

धरमपेठ झोन क्र. : 0712-2565589/ 2567056/ 9823245671

हनुमाननगर झोन क्र. : 0712-2755589/9823245673

धंतोली झोन क्र. : 0712-2465299 /2432344/9823350242

नेहरूनगर झोन क्र.: 0712-2700090/ 2702126, 9823313064

गांधीबाग झोन क्र.: 0712 2735599/ 2739904, 9823313086

सतरंजीपुरा झोन क्र. : 7030577650/ 9823313105

लकडगंज झोन क्र. : – 0712 2737599/ 2739020 / 9850342942

आशीनगर झोन क्र. : 0712-2653476/9923799884

मंगळवारी झोन क्र. : 0712-2599905/ 9823245679

Advertisement
Advertisement