Published On : Wed, Mar 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गॅस सिलिंडर साठेबाजीवर प्रशासनाचा कडक इशारा; अवैध साठा आढळल्यास थेट गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : शहरात गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन ईटनकर यांनी स्पष्ट केले की, गॅस सिलिंडरची साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल.

शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी गॅसचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. गॅस एजन्सी, गोदामे तसेच संशयित ठिकाणांवर अचानक छापे टाकून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Gold Rate
Mar 10, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,61,800/-
Gold 22 KT ₹ 1,50,500 /-
Silver/Kg ₹ 2,76,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अन्न व नागरी पुरवठा विभागाने शहरात तपासणी मोहीम सुरू केली असून गॅस एजन्सी आणि साठवणूक ठिकाणांची पडताळणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्यपूर्वेतील तणावामुळे काही ठिकाणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवत असला तरी नागपूरमध्ये घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून सिलिंडर साठवून ठेवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दररोज सुमारे वीस हजारांहून अधिक सिलिंडरची विक्री विविध कंपन्यांच्या माध्यमातून केली जाते. तसेच रिफिलिंग प्रकल्पातूनही नियमितपणे मोठ्या प्रमाणात गॅसचा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement