Published On : Mon, Oct 25th, 2021

वैद्यकीय उपकरणे ‘मेड इन इंडिया’ करण्याचा प्रयत्न : ना. गडकरी

महानिओकॉनची 17 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन

नागपूर: विविध औषधे आणि वैद्यकीय उपकरणांबाबत आजही आपण अन्य देशांवर अवलंबून आहोत. त्यामुळेच या उपकरणांच्या किंमतीही आपल्याला खूप द्याव्या लागतात. वैद्यकीय उपकरणेही आपल्या देशात निर्माण होऊ शकतात. विविध औषधे आणि वैद्यकीय उपकरणे ‘मेड इन इंडिया’ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Advertisement

महानिओकॉनच्या पश्चिम विभागाच्या दुसर्‍या व महाराष्ट्राच्या 17 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी शहरातील बालरोग तज्ञ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले- संत्र्याचे शहर म्हणून नागपूर ओळखले जाते. देशातील एक सुंदर शहर बनविण्याचा आपला प्रयत्न आहे. आगामी काळात मेडिकल हब म्हणूनही नागपूरचे नाव अग्रस्थानी राहील. आजही शेजारच्या राज्यांमधून अनेक रुग्ण नागपुरात उपचारासाठी येतात. पण कोविडच्या काळात लक्षात आले की, नागपुरात अधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

Advertisement

त्यामुळेच चॅरिटेबल, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. कोविडने आम्हाला खूप शिकविले आहे. ऑक्सीजनची कमी, व्हेंटिलेटर, बायपॅप उपलब्ध नाही, अशा कठीण स्थितीत डॉक्टरांनी लोकांची सेवा केली, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

आगामी काळात मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटीप्रमाणेच जिल्हा आणि तालुकास्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रयत्न असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- वैद्यकीय उपकरण निर्मितीत आपण स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात ‘मेड इन इंडिया’ असलेले उपकरणे देशात उपलब्ध व्हावीत. तसेच विविध औषधे निर्मितीसाठी लागणार्‍या परवानग्या स्थानिकांना देऊन येथेच औषध निर्मिती झाली तर अर्ध्या किंमतीत औषधे गरिबांना उपलब्ध होतील. याप्रमाणेच अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधाही आपल्याकडे अत्यंत कमी आहेत.

https://fb.watch/8RRnZod5iU/

सर्व अवयवांच्या प्रत्यारोपणाच्या व्यवस्थाही येथे उभ्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अभियांत्रिकी असलेल्या तरुणांची संख्या जशी भारतात जास्त आहे, त्याप्रमाणेच वैद्यकीय व्यवसायातील तरुण व तज्ञ डॉक्टरांची संख्याही भारतातच अधिक असेल असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement