Published On : Thu, Jul 25th, 2019

मौजा दाभा येथील अनधिकृत धार्मिक स्थळांवर नासुप्र’ची कारवाई

नागपूर : जनहीत याचिका क्रमांक ८५११/२००६ मध्ये मा. उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशान्वये नासुप्र’च्या मा. सभापती व मा. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवार, दिनांक २५/०७/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पश्चिम नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई आली.

कारवाई करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांमध्ये मौजा दाभा येथील १) शिव मंदिर, चौधरी लेआऊट २) आनंद बौद्ध विहार आणि पंचशिल ध्वज, पालांदूरकर लेआऊट या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. सदर कारवाई २ जेसीबी व २ टिप्पर’च्या साह्याने करण्यात आली.

कारवाई दरम्यान नासुप्र’च्या पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता श्री. अविनाश बडगे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्री. विवेक डफरे, क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिश गुरव व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.