Published On : Sat, Jan 19th, 2019

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पात हा बारकायीने पूर्ण केलेला प्रकल्प : प्रसिद्ध ऍड गुरु ; प्रल्हाद कक्व्कड

Advertisement

नागपूर : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्य आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे तयार होत असून या प्रकल्पाने नवा उच्चांक शासकीय प्रकल्पामध्ये आपले स्थापन स्थापित केले आहे असे गौरवपूर्वक उद्दगार प्रसिद्ध आड गुरु प्रल्हाद कक्व्कड यांनी व्यक्त केले. श्री कक्व्कड एका खाजगी कार्यक्रमा करता आज शहरात आले होते. यावेळी त्यांनी एयरपोर्ट साउथ,न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशन ची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी सांगितले की, निर्माण झालेले मेट्रो रेल स्टेशन

एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनुभव देतात, अतिशय बारकायीने येथील मेट्रो स्टेशनचे कार्य पूर्ण केले असून, प्रकल्पाचे कार्य आश्चर्यचकित करणारे आहेत. अश्या प्रकारच्या प्रकल्पामध्ये अगदी छोट्या बाबींकडे लक्ष दिल्याने या प्रकल्पाचे सौंदर्य आणखी वाढले आहे. स्टेशनचे आर्कीटेव्कचर आणि आतील थ्री-डी पेंटिंग हे आत्ममुग्ध करणारे आहे. शहरात मेट्रो सेवा सुरु झाल्यावर अधिकाधिक नागपूरकरांनी याचा वापर करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला आवढेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisement

महा मेट्रो नागपूर प्रकल्पांतर्गत लवकरच प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी सुरु झाली असून शहरभर याबाबत उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. त्यांनी सांगितले की मेट्रो स्थानकांवर जाहिरातीद्वारे उत्पन्न तयार करण्याकरिता नव-नवे उपाय करायला पाहिजे ज्याने वाढलेल्या महसुलीचा मेट्रोला फायदा होईल. यावेळी श्री. कक्व्कड यांनी नागपूरद्वारे सुरु करण्यात आलेल्या #धावणार माझी मेट्रो विश वॉलवर शुभेच्छा लिहून, या कॅम्पेनचे कौतुक केले. यावेळी महा मेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) श्री. अनिल कोकाटे,महाव्यवस्थापक(ओ अँड एम) श्री. सुधाकर उराडे उपस्थित होते.