Published On : Mon, Sep 2nd, 2019

समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचावे – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

वरुड: डॉ.अनिल बोंडे हे निवडून येणाऱ्या पहिल्या दहा आमदारांमध्ये एक आहेत असे म्हणत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची आणि त्यांनी केलेल्या कामाची स्तुती केली. महाजनादेश यात्रेला आलेली गर्दी पाहता त्याच दिवशी अनिल बोंडे यांचा विजय झाला असल्याचं बावनकुळे म्हणाले.

वरुड येथे भाजपाचा बूथ केंद्र प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, पेज प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यामेळाव्याला कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते.

पाच वर्षात 27 हजार कोटी शेतकरी वर्गाकडे थकित असताना एकाही शेतकऱ्याचे कनेक्शन कापण्याचे पाप आम्ही केले नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले. एकही व्यक्ति असा नाही की ज्याला सरकार कडून काही ना काही मिळाले आहेत याकडेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले. याशिवाय आपल्याला समाजाचे प्रश्न सोड़वायचे आहे. एकेका कार्यकर्ताने समाजाच्या शेवटच्या व्यक्तिपर्यन्त पोहोचा, असे आवाहन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले.

यावेळी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे म्हणाले पाच हजार कोटींची कामे या मतदार संघात केली गेली आहेत. महावितरणची सर्व यंत्रणा आता आम्हाला भूमिगत पाहिजे. 1 लाख 51 हजार मते आता आपल्याला घ्यायचे आहे.असेही त्यांनी नमुद केले.याप्रसंगी पंचायत समिती सदस्यानी तसेच शेकडो कार्यकर्तानी भाजपमधे प्रवेश केला.

या मेळाव्यात आमदार समिरभाऊ कुणावर, जि.प सदस्या सौ.मृणालताई माटे, श्री वामनरावजी खोडे, मंदिराचे अध्यक्ष श्री सुरेश लेंडे, श्री मिलिंदभाऊ भेंडे, श्री अशोकभाऊ कलोडे, स्नेहल कलोडे, श्री राजूभाऊ आडकिने, श्री राजूभाऊ गंधारे, श्री किशोर दिघे, श्री विजय गुरले, श्री राजू भट उपस्थित होते.