Published On : Sat, Jun 5th, 2021

आम आदमी पार्टी चे अजनी वन वृक्ष तोडी विरुद्धात चिपको आंदोलन

अजनी वन येथील या वृक्ष तोडीमुळे मानवांसाठी मोफत ऑक्सिजन उत्पादक स्त्रोतांचे मोठे नुकसान होईल. ही झाडे केवळ मोफत ऑक्सिजन देत नाहीत तर प्रदूषित हवा स्वच्छ करतात आणि जमिनीची तग धरतात. उष्णतामान कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

२०१९ मध्ये इस्रोच्या आरसीसीने एक अहवाल दिला आहे ज्यात असे म्हटले आहे की नागपूरमध्ये गेल्या काही दशकांमध्ये ३०% पेक्षा जास्त हिरवे आवरण (एकतृतीयांश क्षेत्र) गमावले गेले. हे चिंताजनक आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने झाडे तोडल्यामुळे हिरव्या आवरणात अधिक घट होईल.

Advertisement

आयएमएस फेज-१ मधील ४५२२ वृक्ष कापण्याचा तपशील चुकीचा असून अजनी, FCI आणि इरिगेशन विभाग मिळून एकूण लहान मोठी जवळपास ४० हजार झाडे कापली जाणार आहेत, एवढ्या मोठ्याप्रमाणात होणारी वृक्ष तोड म्हणजे न भरून निघणारी पर्यावरणाची हानी आहे. (IMS )प्रकल्प हा एक लक्झरी प्रकल्प आहे जो स्थलांतरित केला जाऊ शकतो किंवा वृक्ष तोड न करता सुद्धा प्रकल्प उभा होऊ

शकतो, परंतु ही वृक्ष तोड किवा झाडांचे प्रत्यारोपण करण्याचे सर्व अनुभव अयशस्वी ठरल्यामुळे झाडांचे प्रत्यारोपण केले जाऊ शकत नाही. तसेच नवीन
वृक्षारोपण सुद्धा कागदावरच राहल्याचे दिसून येते, त्यामुळे याचाही फारसा उपयोग होणार नाही, किंवा जुन्या कापलेल्या झाडांची जागा घेऊ शकत नाही. ही
झाडे अनेक पक्ष्यांसाठी अधिवास आहेत आणि सूक्ष्म हवामानावर नियंत्रण करतात. त्यांना कापल्यास पक्ष्यांची घरे, कीटक नष्ट होतील जे तसेच जैवविविधतेच्या आवश्यक भागांचे परागण करन्यास उपयुक्त आहेत. तसेच हा प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी पर्यावरण मंजुरी घेतली गेली नाही. एकूणच वरील बाबींचा विचार केला असता करदात्यांच्या रकेमतून होत असणाऱ्या अशा प्रकारच्या ‘पायाभूत विकासा’मुळे जगण्याच्या मूलभूत सुविधा (हवा आणि पाणी) पासून वंचित राहण्याची किंमत नागपूरकरांना मोजावी लागेल. त्यामुळे मा मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी हा प्रकल्प मिहान मध्ये किंवा शहराच्या बाहेर घेवून जावा.

हे आंदोलन विधर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े व राज्य कोष्याद्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात प्रमुख्यानी राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय कौंसिल मेंबर अमरीश सावरकर, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, राज्य युवा समिति सदस्य कृतल आकरे, विधर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, दक्षिण नागपुर संयोजक सुरेन्द्र समुद्रे, दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे, मध्य नागपुर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल, युवा नागपुर संयोजक गिरीश तीतरमारे, युवा नागपुर सचिव प्रितिक बावनकर उपस्तित होते.

याचा बरोबर पूर्व नागपुर मधून, बबलू यामीन, रोहित वाघमारे, रविकांत वाघ, अभय भोयर, राहुल सोमकुवर, बबलू मोहाडीकर, पश्चिम नागपुर मधून आकाश कावळे, राहुल कावळे, सुरेश चौधरी, विश्वजीत मसराम उत्तर नागपुर मधून स्वप्निल सोमकुंवर, प्रदीप पोनिकार, पंकज मेश्राम, निशिकांत माटे, योगेश पराते, प्रवीण कुंभारे, जगदीश रोकड़े, अमोल बोडीले मध्य नागपुर मधून विनोद गौर, हरीश वेळेकर, हरीश बोकडे, पार्थ मीरे, विशाल चौधरी, आकाश विभूते दक्षिण नागपुर मधून प्रतिक मीरे, राजू देशमुख, प्रणीत कडु इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement