नागपूर : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त (२६ जून) नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक इशारा देणारी मोठी कारवाई केली.
‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल १२० गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे ४८४ किलो अंमली पदार्थांची सर्व कायदेशीर आणि वैज्ञानिक प्रक्रिया पूर्ण करून विल्हेवाट लावण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या या अंमली पदार्थांचा भंडार बुटीबोरी एमआयडीसी येथील अधिकृत कंपनीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली जाळून नष्ट करण्यात आला.
या कारवाईत गांजा, ब्राऊन शुगर, हेरॉईन, एमडी, मेफेड्रोन पावडर, चरस आणि कोकेनसारख्या घातक अंमली पदार्थांचा समावेश होता. हे सर्व पदार्थ विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले होते. संपूर्ण प्रक्रिया ड्रग डिस्पोजल समितीच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने पार पडली. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी नागपूर पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, युवकांना व्यसनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अशा धडक मोहिमा सातत्याने सुरू राहतील.
Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से...
16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का...
Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews
Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप...
एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप
भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप




