Published On : Wed, Jul 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

बारमध्ये बसून शासकीय फाईल्सवर सही करणाऱ्या PWD अधिकाऱ्यावर कारवाई

उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के निलंबित
Advertisement

नागपूर : नागपूरमधील एका बारमध्ये मद्यप्राशन करत शासकीय फाईल्सवर सही करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्याविरुद्ध अखेर कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे कार्यरत उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले आहे.

ही घटना समोर आली तेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ती चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नागपूरमधील बारमध्ये दोन इतर व्यक्तींसोबत अधिकारी मद्यपान करताना आणि महाराष्ट्र सरकारच्या गोपनीय फाईल्सची पाहणी करताना दिसून आले. या व्हिडिओमुळे प्रशासनात खळबळ माजली होती.

Gold Rate
30 July 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg ₹ 1,14,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून, त्याद्वारे स्पष्ट झाले आहे की संबंधित फाईल्स चामोर्शी (गडचिरोली) येथून नागपूर येथे आणण्यात आल्या होत्या आणि त्या PWD विभागाच्या अधिकृत दस्तऐवजाच होत्या.

राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर चौकशी सुरू झाली आणि संबंधित अधिकारी कोण हे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित देवानंद सोनटक्के यांचे निलंबन आदेश जारी करण्यात आले.

सरकारी कागदपत्रे ही अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असतात. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः मद्यप्राशनाच्या अवस्थेत अशा दस्तऐवजांवर सही करणे हे गंभीर शिस्तभंग मानले जाते. त्यामुळे या प्रकरणात निलंबनासह पुढील तपास व शिस्तभंग कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement