Published On : Tue, Jun 25th, 2019

स्वेच्छानिवृत्त माजी सैनिक देशसेवेसह सरसावले समाजसेवाकडे

महापुरुषांच्या पुतळ्याला दिली छत्रीची सावली

कामठी: बहुधा सैन्य विभागातून सेवानिवृत्त झालेले सैनिक हे इतर शासकीय कार्यालयात नोकरी करतात मात्र कामठी रहिवासी एका माजी सैनिकाने सैन्य विभागात केलेल्या कर्तव्यदक्ष भूमिकेतून केलेल्या देशसेवा च्या भूमिकेसह समाजसेवा करण्याच्या स्वेच्छेने सैन्य नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेत समाजसेवाकडे लक्ष वेधले तर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी या माजी सैनिकानी तेजस बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून केलेल्या विविध उपक्रमातून नावलौकिक केले असून याच समाजसेवेच्या ध्येयातून महापूरुषांच्या पुतळ्याला छत्रीचे संरक्षण देण्याच्या भूमिकेतून काल 24 जून ला जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा तसेच गोयल टॉकीज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला स्टील चे छत्रीचे संरक्षण देण्यात आले. तर माजी सैनिकाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद तसेच ऐतिहासिक ठरला.या माजी सैनिकाचे नाव चंद्रशेखर अरगुल्लेवार असे आहे. मागील कित्येक वर्षांपासून कामठी शहरात विविध महापूरुषांचे पुतळे हे उघड्यावर वसलेले आहेत त्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणा अभावी या महापूरुषांच्या पुतळ्याना ऊन , वारा, पावसाची झळ सोसावी लागते तेव्हा सोसाव्या लागणाऱ्या झळ पासून संरक्षण व्हावे या मुख्य उद्देशाने काल 24 जून ला तेजस बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी स्टील ने बनलेली बनी बेस छत्री स्थापित करून सावलीचे रक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यां तसेच माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, भन्ते नागदीपंकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, तेजस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व माजी सैनिक चंद्रशेखर अरगुल्लेवार, संस्था उपाध्यक्ष देवीदास पेटारे , सचिव किशन अरगुलेवार , कोषाध्यक्ष गोविंद मामड़ीवार संस्था मुख्यमार्गदर्शक विंनोद कास्त्री गुरुजी , संस्था सम्पर्कप्रमुख नरेंद्र शिंदे , संस्था मार्गदर्शक रूपलाल समुन्द्रे , सहयोगी विजय कोन्डूलवार , संतोष यादव , वरिष्ठ मार्गदर्शक व नगरसेवक महेन्द्र भूटानी,, दीक्षाभूमि नागपुर चे कार्यकारी अध्यक्ष विलासभाऊ गजघाटे , कलमना मार्केट नागपुर चे माजी अध्यक्ष श ओंकार (दादा) गोलवाड़े, जाबुवंतराव विचार धोटे मंच चे सुनील चोखारे , राष्ट्रीय कीर्तनकार चंद्रशेखर डोमटे , , , विदर्भ एकता मंच कामठी चे अनवारुलहक पटेल , मजहर , शिवसेनेचे पदाधिकारी राधेश्याम हटवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याकार्यक्रम च्या यशस्वितेसाठीव तेजस संस्था चे समस्त पदाधिकारी व सदस्य तसेच संस्थेचे सहयोगी अशोक खड़से , दिनेश बिल्लरवान , सतीश यादव ,श्रीराम सेना चे मनीष वासे , युवा शक्ति यश जलवानीय , अनिल मरबते विक्की मेश्राम रवि मेश्राम सेवक शिंदे ,रोहित बिल्लरवान ,नरेश मंथपुरवार , ज्ञानू कायरवार , बजरंग दल कामठी रोहन बिल्लरवान , तेजस संस्था ची युवा शक्ति युवा ब्रिगेड आदींनी सहभाग नोंदवून मोलाची भूमिका साकारली.

– संदीप कांबळे कामठी