Published On : Wed, Jul 10th, 2019

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे २१ हजार ५८९ जणांवर कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे करण्यात आलेल्या विविध प्रकरणामध्ये दहाही झोनमधील २१ हजार ५८९ व्यक्ती, संस्था,दुकाने आदींवर कारवाई करण्यात आली आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.

मनपाच्या उपद्रव शोध पथकामध्ये एक कमांडर, दहाही झोनचे दहा प्रमुख आणि ३० सुरक्षा सहायक असून अशा ४१ जणांच्या पथकाद्वारे संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, विविध संस्था, हॉटेल्स, दवाखान्यांद्वारे नियमभंग करून स्वच्छ नागपूरची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो. शहराच्या स्वच्छतेमध्ये शहरातील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये शिस्त लावणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मनपाच्या उपद्रव पथकाद्वारे नियंत्रण ठेवले जाते दंडात्मक कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिस्त निर्माण केली जात आहे.

‘आपले शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. कुणीही रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकू नये यासाठी प्रत्येकाने कर्तव्यभावनेतून आपल्या परिसराची काळजी घ्यावी. पथकाचे उद्देश नागरिकांवर दंड लावणे नाही किंबहुना त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणेव शिस्त लावणे आहे. आपले शहर व स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे यावे’, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

मनपाद्वारे १३ टन ६६२ क्विंटल प्लास्टिक जप्त
नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या प्लास्टिक जप्ती कारवाईमध्ये २४ हजार ९८६ दुकानांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७९३ दुकानदारांवर कारवाई करीत १३ टन ६६२.८४० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये ९४ दुकानांना नोटीस बजावण्यात आल्या असून लक्ष्मीनगर झोनमधील एका दुकानावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथक व झोनमध्ये नियुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे ७८२ दुकानांवर कारवाई करीत १३ टन ६३६.६४० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आली आहे. पथकाद्वारे ९० दुकानांना नोटीस बजावण्यात आले. तर झोनस्तरीय पथकाद्वारे ११ दुकानांवर कारवाई करून २६.२०० किलो प्लास्टिक जप्तीसह चार दुकानांना नोटीस बजावून एका दुकानावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे करण्यात आलेली कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे – ८१० जणांवर कारवाई

उघड्यावर लघुशंका – ११९२ जणांवर कारवाई

हाथगाड्या, स्टॉल्स, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांकडून अस्वच्छता – २८९५ जणांवर कारवाई

रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेत कचरा – ३२६ जणांवर कारवाई

दुकानदारांमार्फत रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेत कचरा – १५१६ दुकानदारांवर कारवाई

शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस मार्फत कचरा – ७६९ जणांवर कारवाई

दवाखाने, पॅथलॅब मार्फत कचरा – ११६ जणांवर कारवाई

मॉल, उपहारगृह, लॉजींग, बोर्डींग हॉटेल्स, चित्रपटगृह, मंगल कार्यालय, कॅटरर्स द्वारे कचरा – ४४२ जणांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी जाहिरात फलक, बॅनर – १३ जणांवर कारवाई

वैयक्तिक कामाकरीता रस्त्यावर मंडप, स्टेज – ४१० जणांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणे – १७० जणांवर कारवाई

रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेत जनावरे धुणे – १७७ जणांवर कारवाई

चिकन सेंटर, मटन विक्रेत्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा – १८५ जणांवर कारवाई

वैद्यकीय व्यावसायीकांद्वारे बायोमेडीकल कचरा साधारण कच-यात टाकणे – १७ जणांवर कारवाई

वर्कशॉप, गॅरेज मालकांकडून मोकळ्या जागी कचरा – ७७० जणांवर कारवाई

फुटपाथ हातगाडीवरील व्यवसायीक – १४२ जणांवर कारवाई

पक्के बांधकामातील व्यावसायीक – १५४ जणांवर कारवाई

व्यक्तींद्वारे सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी बांधकाम साहित्य – ६४४० जणांवर कारवाई

बिल्डरद्वारे सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी बांधकाम साहित्य – १०० जणांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी बांधकामाचा मलबा, टाकाउ कचरा – १४७ जणांवर कारवाई

व्यक्तींद्वारे करण्यात आलेले इतर उपद्रव – १८६३ जणांवर करवाई

संस्थांद्वारे करण्यात आलेले इतर उपद्रव – २०५७ संस्थांवर करवाई

सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळणे – ५१ जणांवर कारवाई

हरित लवादच्या आदेशानुसार विवाह सभागृह, लॉनवर कारवाई – ४५ जणांवर कारवाई

प्लास्टिक जप्ती – ७८२ जणांवर कारवाई