Published On : Wed, Jul 10th, 2019

15 जुलै, सोमवारी मंत्रालय लोकशाही दिन

मुंबई : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 15 जुलै, 2019 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे,असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

राज्यातील शासकीय, निम-शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संदर्भात मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत अशा अर्जदारांनी दि. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षात उपस्थित रहावे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनात मुख्यमंत्री यांच्यासमक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे, असेही सामान्य प्रशासन‍ विभागातर्फे एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.