Published On : Wed, Jul 10th, 2019

गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात४८९ रस्ते

Advertisement

नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत (पीएमजीएसवाय) गेल्या तीन वर्षात देशभरात 1 लाख 45 हजार 198 कि.मी.चे 27 हजार 337 रस्ते बांधण्यात आले असून महाराष्ट्रात 2 हजार 837 कि.मी.चे 489 रस्ते बांधण्यात आले आहेत.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत’ देशातील 29 राज्यांच्या ग्रामीण भागात 2016-2017 , 2017-2018 आणि 2018-2019 या तीन वर्षांच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत लिखित उत्तरात दिली.

महाराष्ट्रात 2 हजार 837 कि.मी.चे 489 रस्ते
महाराष्ट्रात वर्ष 2016-2017 मध्ये 2 हजार कि.मी. आणि 700 मिटरचे 199 रस्ते बांधण्यात आले. वर्ष 2017-2018 मध्ये 569 कि.मी. आणि 758 मिटरचे 196 रस्ते बांधून झाले तर वर्ष 2018-2019 मध्ये 266 कि.मी. आणि 828 मिटरच्या 94 रस्त्यांचे बांधकाम झाले.

देशातील 29 राज्यांमध्ये अनुक्रमे वर्ष 2016-2017 मध्ये 47 हजार 446 कि.मी. आणि 300 मिटरचे 8 हजार 410 रस्ते बांधण्यात आले. वर्ष 2017-2018 मध्ये 48 हजार 714 कि.मी. आणि 600 मिटरचे 9 हजार 695 रस्ते बांधून झाले तर वर्ष 2018-2019 मध्ये 49 हजार 37 कि.मी. आणि 550 मिटरच्या 9 हजार 232 रस्त्यांचे बांधकाम झाले.