Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. २१ मे) रोजी ३१ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,५३,००० चा दंड वसूल केला. हनुमाननगर झोन अंतर्गत हुडकेश्वर रोड येथील गुरुकृपा किरणा, गुप्ता ट्रेडर्स, पवन ट्रेडर्स या दुकानांना हनुमाननगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.
तसेच गांधीबाग झोन अंतर्गत मोमीनपूरा मधील एम.एल. कॅन्टीन, अनन्या कलेक्शन, अरमन चिकन सेंटर, मदनी चिकन सेंटर आणि के.जी.एन.हॉटेल या दुकानाला गांधीबाग झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.
पथकाने ५१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.