Published On : Fri, May 21st, 2021

कोव्हिड काळात गरीब नागरिकांची नळ जोडणी थकबाकी करीता कापू नये

Advertisement

जलप्रदाय समिती सभापती यांचे निर्देश : कळमना टाकी मान्सून च्या आधी सुरु करा

नागपूर : कोव्हिड -१९ च्या काळात गरीब लोकांवर उपासमारीची पाळी आल्यामुळे अश्या नागपुरातील गरीब लोकांवर पाणी बिलाची थकबाकी असल्यामुळे कोणत्याही अश्या गरीब नागरिकांची नळ जोडणी लॉक डाउन संपे पर्यंत कापण्यात येऊ नये असे आदेश जलप्रदाय समिती सभापती श्री. संदीप गवई यांनी दिले.

तसेच त्यांनी मागील ९ वर्षापासून नासुप्र तर्फे बांधकाम करून तयार केलेल्या पाण्याच्या टाकीचे अजून पर्यंत लोकार्पण करण्यात आलेले नाही . यांची दखल घेता जलप्रदाय सभापतींनी कळमना येथील तयार असलेल्या टाकीला भेट दिली आणि संबंधित सर्व मनपा आणि ocw आणि wapcos यांच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून आढावा घेतला .

अर्धवट असलेले सर्व कामे ३० मे च्या आत पूर्ण करून मान्सून सुरु व्हायच्या आत टाकीच्या लगतच्या नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. या प्रसंगी मनपा चे कार्य. अभि.मनोज गणवीर, डेलिगेट मंसूर शाह, वापकॉस चे दीपांक अग्रवाल आणि ocw चे झोनल हेड नितीन गुल्हाने, शैलेंद्र बोरकर यांसह अनेक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी जलप्रदाय च्या सर्व अधिकाऱ्यांना अमृत योजने अंतर्गत जलवाहिन्याची कामे जास्तीत जास्त वेगाने दिवसरात्र काम करून नॉन नेटवर्क एरिया मध्ये लवकरात लवकर पाणी पोहचविण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले .