Published On : Fri, Jun 4th, 2021

लग्न समारंभासह २६ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. ४ जून) रोजी दोन लग्न समारंभाचे ठिकाणासह २६ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,५०,००० चा दंड वसूल केला. आशीनगर झोनच्या चमूंनी वीनस क्रिटीकल केयर रुग्णालयाला रु ४०,००० चा दंड सामान्य कच-यामध्ये जैविक कचरा टाकण्यासाठी केला.

तसेच गांधीबाग झोन व सतरंजीपूरा झोनच्या चमूने दोन वेगवेगळया लग्न समारंभात कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रत्येकी रु १०,००० चा दंड लावला. पथकाने ४३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.