Published On : Thu, Jun 3rd, 2021

गुरुवारी २० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ३ जून) रोजी २० दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,३०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ६४ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.