Published On : Mon, Jul 12th, 2021

सोमवारी १९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. १२ जुलै ) रोजी १९ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,३१,००० चा दंड वसूल केला. पथकाने ६३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.